ताज्या बातम्या

ब्रिटनचे नवीन राजे म्हणून प्रिन्स चार्ल्स आज पदग्रहण करणार

Published by : Siddhi Naringrekar

राणी एलिथाबेथ यांच्या निधनानंतर प्रिन्स चार्ल्स आज पदग्रहण करणार आहेत. आज होणाऱ्या पदग्रहण कार्यक्रमात सुमारे 700 पाहुणे सहभागी होण्याची शक्यता आहे. यामध्ये ज्येष्ठ खासदारांचा एक गट, काही अधिकारी, राष्ट्रकुल देशातील उच्चायुक्त आणि लंडनचे लॉर्ड महापौर सहभागी होतील. कमी वेळेत पदग्रहण सोहळा आयोजित झाल्याने अनेक पाहुणे या कार्यक्रमात अनुपस्थित राहण्याची शक्यता आहे. ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर भारतात एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. रविवारी, 11 सप्टेंबर रोजी भारतात राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला असून या दिवशी सरकारी आणि राष्ट्रीय इमारतींवर राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर ठेवण्यात येणार आहे.

भारतीय प्रमाण वेळ दुपारी 2.30 वाजता सेंट जेम्स पॅलेसमधील बैठकीत चार्ल्स यांना अधिकृतपणे ब्रिटनचे राजे म्हणून घोषित केले जाईल. महाराणी एलिझाबेथ यांच्यासाठी कॅथेड्रलमध्ये विशेष प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली आहे. ऑपरेशन यूनिकॉर्ननुसार महाराणी एलिझाबेथ यांचे पार्थिव तूर्तास स्कॉटलंड येथील होलीरुड निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे. एलिझाबेथ यांचे पार्थिव 13 सप्टेंबर रोजी लंडन येथे नेण्यात येणार आहे.

चार्ल्स यांना आज महाराज म्हणून जाहीर केले तरी त्यांचा राज्याभिषेक सोहळा काही दिवसांनी आयोजित करण्यात येईल. आज होणारा कार्यक्रम हा पदग्रहण सोहळा असणार आहे. राज्याभिषेक सोहळ्यासाठी विशेष तयारी केली जाते. या सोहळ्याचे विशेष नियोजन केले जाते.

काँग्रेस उमेदवार कन्हैया कुमार यांना मारहाण; रोहित पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

ईशान्य दिल्लीत काँग्रेस उमेदवार कन्हैया कुमार यांना मारहाण

भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला

हरियाणात भाविकांच्या बसला भीषण आग

अमरावती महापालिका कर्मचाऱ्यांचा संप चौथ्या दिवशी स्थगित