Prithvi Shaw Cricket Career News : एकेकाळी भारतीय क्रिकेटचा हिरो समजल्या जाणाऱ्या पृथ्वी शॉचा सध्या वाईट काळ सुरु आहे. कसोटीमध्ये पदार्पणात 2018 मध्ये धावा करुन सर्वांचं लक्ष वेधून घेणाऱ्या शॉला मात्र 2015 च्या IPL मध्ये त्याला कोणत्याही संघाने खरेदी केले नाही. एका मुलाखतीमध्ये शॉने स्वतःच्या चुका सांगितल्या आहेत. शॉ म्हणाले की, "माझ्या अधोगतीचे अनेक कारणे आहेत. मीच माझ्या अधोगतीचे कारण आहे. मी आयुष्यात खूप चुकीचे निर्णय घेतले आहे."
"मी क्रिकेटला खूप कमीवेळ दिला आणि चुकींच्या संगत धरली. क्रिकेटला 8 तास देणार मी केवळ 4 तासांचा सराव सुरु केला. मोठ्या क्रिकेटपटू सोबत असलेला संपर्क तोडला, ज्यावेळेस माझा केठीण काळ सुरु होत्या, त्यावेळस कोणत्याही क्रिकेटपटूने मला कॉल केला नाही, फक्त ऋषभ पंत माझ्याशी बोलला,"
भारतीय संघात निवड झाल्यानंतर आपण करिअरच्या शिखरावर होतो, अशा शब्दांत शॉने आपल्या अनुभवांची कबुली दिली, तेव्हा म्हणाला की, "जेव्हा आपण यशस्वी असतो, त्यावेळस आपले खूप मित्र बनतात. त्यांच मित्रांमुळे माझं क्रिकेट मागे पडले. नको त्याठिकाणी त्यांनी मला घेऊन जाण्यास सुरुवात केली. दरम्यान माझा कठीण काळ सुरु झाला होता. या कठीण काळात सचिन तेंडुलकरने मला समजावले. सचिन सरांनी मला आणि अर्जुनला एकत्र वाढताना पाहिजे आहे. मी अनेकवेळा त्यांच्या घरी गेलो आहे. माझ्याशी बोलून मला आधार दिला," असे शॉने सांगितले. परंतू अशातच माझ्या आजोबांचे निधन झाले आणि पुन्हा मानसिकदृष्ट्या मी खचलो. आता क्रिकेटविश्व शॉकडून पुनरागमनाची वाट पाहत आहे."