ताज्या बातम्या

जसं ठाकरेंसोबत वागले तसं शिंदेंसोबत भाजपने वागू नये- पृथ्वीराज चव्हाण

महायुती सरकारचा शपथविधी सोहळा 5 डिसेंबर 2024 रोजी मुंबईतील आझाद मैदानावर होणार आहे. देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

Published by : shweta walge

थोडक्यात

  1. महायुती सरकारचा शपथविधी सोहळा 5 डिसेंबर 2024 रोजी मुंबईतील आझाद मैदानावर होणार आहे.

  2. देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

  3. देवेंद्र फडणवीस यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना शपथविधीसाठी उपस्थित राहण्याचा फोन केला आहे.

महायुती सरकारचा आज गुरुवारी (5 डिसेंबर 2024) मुंबईतील आझाद मैदानावर महायुतीचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस आज तिसऱ्यांदा मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेणार आहेत तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित रहा असा फोन देवेंद्र फडणीस यांनी केला असल्याचं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितल.

शपथविधीसाठी उपस्थित रहा असा फोन देवेंद्र फडणीस यांनी केला असल्याचं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितला यावेळी त्यांना महाराष्ट्राच्या हिताचं निर्णय घेण्यासाठी मी शुभेच्छा दिल्याचे देखील चव्हाण यांनी सांगितले.

ते म्हणाले की, 2019 मध्ये उद्धव ठाकरें बाबत जे झालं तो इतिहास आहे आणि म्हणूनच मी असं म्हटलं की जसं उद्धव ठाकरेंच्या बाबतीमध्ये भाजप वागले तसेच शिंदे यांच्या बाबतीमध्ये भाजपने वागू नये यासाठी मी ते वक्तव्य केलेलं होतं. दुसरं आज जी शपथविधी सोहळ्याच्या आग्रह आमंत्रणाची पत्रिका आलेली आहे यामध्ये शिंदे यांच्या नावाचा उल्लेख नाही त्यामुळे नेमकं काय हे सांगता येणार नाही ते शपथ घेणार का नाही हे अजून स्पष्ट नाही. तसंच जर शिंदेंचा अपमान होत असेल तर त्यांच्या कोणत्याही सहकार्याने सरकारमध्ये सहभागी होता कामा नये आणि अजूनही नाराजी नाट्य असल्याचं यावरून दिसून येतेय. आणि भाजपाचा पक्ष कसा फोडायचे यामध्ये हातखंडा आहे. असं मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : CSMT परिसरातील वाहतूक पुर्वपदावर

Manoj Jarange Maratha Protest : आंदोलन संपलं! नवी मुंबईत मराठा आंदोलकांसाठी आलेल्या शिदोरीचा पुर; उरलेल्या अन्नाचं काय केलं?

Donald Trump vs PM Modi : ट्रम्प यांची भारताच्या टॅरिफ धोरणावर टीका; अमेरिकन आयात शुल्क कमी करण्याची तयारी

Ajit Pawar On Manoj Jarange Maratha Protest : 'मराठा समाजाच्या अपेक्षांना न्याय देण्याचा शासनाचा प्रयत्न'- अजित पवार