ताज्या बातम्या

'भाजप सरकारची ब्रिटिश काळापेक्षा गंभीर हुकूमशाही' पृथ्वीराज चव्हाण

भाजप सरकारची ब्रिटिश काळापेक्षा गंभीर हुकूमशाही असल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. ईव्हीएम आणि निवडणूक प्रक्रियेत संशयास्पद कारभाराबाबत आवाज उठवणाऱ्यांवर कारवाई होत असल्याचे त्यांनी सांगितले.

Published by : shweta walge

नुकत्याच राज्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम व अन्य निवडणूक प्रक्रियेमध्ये झालेल्या संशयास्पद कारभाराबाबत आवाज उठवला तर कारवाई करण्यात येत आहे, त्यामुळे भाजप सरकारची ब्रिटिश काळापेक्षा गंभीर हुकूमशाही आहे असा आरोप राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज रविवारी आठ डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजता जिल्हा काँग्रेस कमिटी पत्रकार परिषदेत व्यक्त केला आरोप केला.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, मारकडवाडीमध्ये जी घटना झाली ती अत्यंत निंदनीय आहे. मारकडवाडीमध्ये शासनाने जी दडपशाही करून खटले भरले ते ब्रिटिश काळातील दडपशाहीपेक्षा वाईट आहे. पारदर्शक निवडणुका घेणे निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे. लोकशाही वरचा नागरिकांचा विश्वास उडाला आहे.

ईव्हीएम हटवून बॅलेट पेपर वर निवडणूका घेणे गरजेचे आहे. सर्वसामान्य नागरिकाचा नागरिक म्हणून जो अधिकार आहे तो निवडणूक आयोग दडपू शकत नाही. 2019 ला ईव्हीएम बद्दल मी एक स्टेटमेंट केलं होतं ती 2019 ची जुनी क्लिप चालवून विरोधकांनी राजकारण केले. पूर्वीच्या मशीन आणि आताच्या मशीनमध्ये खूप मोठी तफावत आहे. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आमचा लढा आहे. लोकशाही धोक्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी ईव्हीएम मशीनची निष्पक्षपाती पणे चौकशी करावी अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

व्हीव्हीपॅट मधील शंभर टक्के चिट्ट्या मोजा, मशीनचा आकडा आणि VVPAT चा 100 टक्के आहे. निवडणूक काळात इलेक्शन कमिशन ने 800 कोटी रुपये जप्त केले आहेत. त्यातील व्हीव्हीपॅट चौकशी साठी खर्च करावा. चिठ्ठ्या मोजा. महविकास आघाडीचे सर्व नेते मिळून पुढील निर्णय घेणार.

लाडकी बहीणीबाबत आमची काहीही तक्रार नाही. निवडणुकीत पैसे वाटप केले गेले हे निवडणूक आयोगाचे अपयश आहे. निवडणूकीत पैशाचा प्रभाव वाढला आहे. त्यामुळे भविष्यात सामान्य नागरिकाला या प्रक्रियेत भाग घेता येणार नाही. विधिमंडळ सदस्यांनी विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली नाही तर त्यांना सभागृहात बोलता येत नाही.

आम्हाला लोकसभेला ६२ टक्के जागा मिळाल्या होत्या त्यानंतर चारच महिन्यात विधानसभेला फक्त १५ टक्के जागा मिळाल्या. चार महिन्यात असं काय घडलं की निकाल एवढा फिरला. काहीतरी गडबड नक्कीच आहे.

मारकडवाडीत आंदोलन करता येत नाही ही सरकारची दडपश आहे. सत्ताधाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालय व निवडणूक आयोगाला हाताशी धरून लोकशाहीचा गळा घोटला हा संविधानाचा अपमान आहे. निवडणूक आयोग आणि सरकार एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. देशात लोकशाही जिवंत आहे की नाही हा खरा प्रश्न?

देशातील लोकशाही संपलेली आहे. फुले शाहू आंबेडकर यांचा विचार काँग्रेस यापुढेही जपत राहील. मारकडवाडी प्रकरणात सरकार एवढे का घाबरते नागरिकांच्या मागणीप्रमाणे बॅलेट पेपरवर का निवडणूक घेत नाहीत. ईव्हीएम निवडणूक प्रक्रियेवर नागरिकांचा विश्वास नाही.

गेल्या आठवड्यात सामान्य नागरिकांच्यावर मारकडवाडीत खटले भरले तर आज शरद पवार मारकवाडीला भेट देत आहेत मग त्यांच्यासारख्या नेत्यांवरही सरकारने खटले भरण्याचे धाडस दाखवावे असा इशारा दिला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : CSMT परिसरातील वाहतूक पुर्वपदावर

Manoj Jarange Maratha Protest : आंदोलन संपलं! नवी मुंबईत मराठा आंदोलकांसाठी आलेल्या शिदोरीचा पुर; उरलेल्या अन्नाचं काय केलं?

Donald Trump vs PM Modi : ट्रम्प यांची भारताच्या टॅरिफ धोरणावर टीका; अमेरिकन आयात शुल्क कमी करण्याची तयारी

Ajit Pawar On Manoj Jarange Maratha Protest : 'मराठा समाजाच्या अपेक्षांना न्याय देण्याचा शासनाचा प्रयत्न'- अजित पवार