ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कार्यवाही थंडावली, १५ दिवसात एकही गुन्हा उघडकीस नाही

दोन दिवसांपूर्वी पोलीसांनी सुमारे पावणे दोन कोटीचा मद्यसाठा जप्त करण्यात यश मिळवले.

Published by : Sagar Pradhan

प्रशांत जव्हेरी|नंदुरबार: सध्या गुजरात विधानसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरू असून त्या ठिकाणी होणाऱ्या अवैध मद्यतस्करी रोखण्यासाठी त्या-त्या पोलीस ठाण्याच्या कर्मचा-यांनी मद्यपुरवण्यावर कडक निर्बंध घातले असुन दोन दिवसांपूर्वी पोलीसांनी सुमारे पावणे दोन कोटीचा मद्यसाठा जप्त करण्यात यश मिळवले. त्या पाठोपाठ आज नंदुरबार शहरात एका अज्ञात इसमाकडून गावठी पिस्तूल हस्तगत करण्यातही शहर पोलीसांनी दमदार कामगिरी बजावली आहे.

नंदुरबार शहर व जिल्हयात वाढच्या गुन्हेगारीवर अंकुश मिळवण्यासाठी पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांचे मार्गदर्शन कौतुकास्पद ठरत असून दि .२८ रोजीच्या मध्यरात्री एका अज्ञात इसमाकडून गावठी पिस्तोल हस्तगत करण्यात शहर पोलीस निरीक्षक यांना यश मिळले आहे . अर्थात त्यांची कामगिरी नेहमीच समाधानकारक राहिली आहे . गुन्हे अन्वेषण शाखेत कार्यरत असतांना व सध्याचे शहर पोलीस निरीक्षकांनी वेळो-वेळी दमदार कामगिरी - पार पाडली आहे . मात्र गेल्या १५ दिवसांपासून गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई थंड पडल्याची दिसून येत आहे. १५ दिवसात एकही ठोस गुन्हा उजेडात आणण्यांत स्थानिक गुन्हे शाखेला यश आल्याचे दिसून येत नाही.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Periods Delaying Pills : धक्कादायक! मासिक पाळी थांबवण्यासाठी गोळ्या खाणं जीवावर बेतलं; तरुणीचा मृत्यू

Ganesh Chaturthi 2025 : गणेशोत्सवावर सीसीटीव्हीची करडी नजर; 15 हजार पोलिसांचा बंदोबस्त

Latest Marathi News Update live : मुंबईच्या राज्याचे प्रथम दर्शन