ताज्या बातम्या

नागपूरमध्ये Income Tax Raid सत्र सुरूच; सोन्या-चांदीच्या दुकानावरही आयकर विभागाकडून धाड

सध्या विदर्भ मराठवाड्यात आयकर विभागाचं धाडसत्र वेगाने सुरु आहे. बेनामी मालमत्ता मोठ्या प्रमाणात आढळून आल्याने हे धाडसत्र राबवण्यात आले आहे.

Published by : Team Lokshahi

सध्या विदर्भ मराठवाड्यात आयकर विभागाचं धाडसत्र वेगाने सुरु आहे. बेनामी मालमत्ता मोठ्या प्रमाणात आढळून आल्याने हे धाडसत्र राबवण्यात आले आहे. आतापर्यंत विदर्भ, मराठवाड्यातील सुमारे 452 कोटींची बेनामी मालमत्ता जप्त करण्यात आली असून 14 मे रोजी अमरावती जिल्ह्यात सोन्या-चांदीच्या दुकानावरही आयकर विभागाकडून धाड टाकण्यात आली.

नागपूर शहरात सध्या आयकर विभागाची मोठी कारवाई झालेली पाहायला मिळत आहे. यासाठी आयकर विभागातर्फे या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी वेगळे डेस्क तयार करण्यात आले आहे.

बेनामी संपत्ती म्हणजे गैरप्रकाराने गोळा केलेल्या रकमेच्या किंवा स्थावर संपत्तीच्या माध्यमातून आपल्यावर शंका येऊ नये, यासाठी ती इतर कुणाच्या नावावर करणे होय. यामध्ये नाहक सामान्य नागरिकांना वेठीस धरले जाते . मात्र या प्रकरणाला कुठे तरी आळा घालण्यासाठी आणि बेनामी मालमत्ता उघडकीस यावी, तसेच दोषींवर कारवाई व्हावी, यासाठी नागपूरच्या आयकर विभागाचे विशेष धाडसत्र सुरु झाले असून काल, बुधवारी अमरावती जिह्यात त्याची अंबलबजावणी सुद्धा करण्यात आली. सामान्यपणे जगणाऱ्या नागरिकांच्या नावावर सहकारी सोसायटीच्या खात्यात मोठी रक्कम ठेवल्याची ही प्रकरणे असून सर्व 30 प्रकरणांचा तपास तीव्र गतीने सुरू आहे. ही कारवाई 2016 च्या बेनामी व्यवहार प्रतिबंध सुधारित कायद्याखाली करण्यात आली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा