ताज्या बातम्या

Ratnagiri : वेश्या व्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश, आणखी एक आरोपी अटकेत

रत्नागिरी शहरातील वेश्या व्यवसायाच्या रॅकेटची व्याप्ती मोठी असल्याचे तपासात उघड

Published by : shweta walge

निसार शेख,चिपळूण;- रत्नागिरी शहरातील वेश्या व्यवसायाच्या रॅकेटची व्याप्ती मोठी असल्याचे तपासात उघड झालं आहे. या प्रकरणामध्ये अनेक जण अडकण्याची शक्यता व्यक्त होत आहे. काहींचे सीडीआर काढण्यात येत असून, सीसीटीव्ही फुटेजचीही मदत घेतली जाणार आहे. रत्नागिरी तालुका, जिल्हा आणि बाहेरच्या अनेकांचा यामध्ये समावेश असल्याचे बोलले जात आहे अब्दुल मतीन हसनमियाँ डोंगरकर (३६, रा. बोर्डिंग रोड माळनाका, रत्नागिरी) आणि ओमकार जगदीश बोरकर (चिंचखरी, रत्नागिरी) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे असल्याचे त्यांनी सांगितले.

शहरातील शिवाजीनगर येथील सिध्दीविनायक नगर या मध्यवर्ती ठिकाणी इमारतीमधील एका फ्लॅटमध्ये दोन तरुणींचा वापर करून राजेंद्र रमाकांत चव्हाण वेश्या व्यवसाय चालवत असल्याचे पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात उघड झाले. त्यानंतर गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने २० जुलैला दुपारी चव्हाण याला अटक केली.

तसेच दोन पीडित महिलांना ताब्यात घेतले. संशयिताला न्यायालयात हजर केले असता पोलिस कोठडीत रवानगी केली. त्याची कसून चौकशी केल्यावर त्याच्या मोबाईल क्रमांकाच्या सीडीआरवरून त्याच्या या दोन साथीदारांचाही या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निश्चित झाले. हे तिघेही या व्यतिरिक्त अन्य ठिकाणी वेश्या व्यवसाय चालवत असल्याचे निष्पन्न झाल्यावर शहर पोलिसांनी या दोन्ही संशयितांना अटक केली. या प्रकरणी शहर पोलिस अधिक तपास करत आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Anjali Damania On Dhananjay Munde : 'ती' फाईल गायब केली' दमानियांचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल

Devendra Fadnavis Called Sharad pawar And Uddhav Thackeray : "आम्हाला तुमच्याही पाठिंब्याची गरज" फडणवीसांची थेट पवार आणि ठाकरेंना फोनवर विनंती; राजकीय वर्तुळात भूकंप

Share Market News : रशिया-युक्रेन युद्ध संपण्याच्या शक्यतेने गुंतवणूकदारांना दिलासा; सेंसेक्स आणि निफ्टीत वाढ

Himachal Monsoon : हिमाचल प्रदेशात पावसाचा कहर! आत्तापर्यंत 276 नागरिकांचा मृत्यू