ताज्या बातम्या

Pune : कर्नाटकात मराठी ड्रायव्हरला मारहाणीचा निषेध,पुण्यात कर्नाटकच्या बसला फासले काळे

स्वारगेटमध्ये शिवभक्तांनी कर्नाटकमध्ये मराठी ड्रायव्हरवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करत कर्नाटकच्या बसला काळे फासले.

Published by : Prachi Nate

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस चालकाला कर्नाटकात कन्नड येत नाही म्हणून कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे कन्नड रक्षण वेदिकेच्या गुंडांनी महाराष्ट्र एसटी बसला आणि बस चालकाला काळे फासल्याच्या घटना घडली. हे लक्षात घेऊन कर्नाटकातून महाराष्ट्राकडे जाणारी बस सेवा थांबवण्यात आली होती. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या मुंबई बंगळुरू बसवर कन्नड कार्यकर्त्यांनी हल्ला केला.

यानंतर बस चालकाला एसटी बसमधून खाली ओढून "कर्नाटकात यायचं असेल तर कन्नड बोलायलाच हवं" असं म्हणत कार्यकर्त्यांनी एसटी बसला आणि चालकाच्या तोंडाला काळे फासले. काही काळासाठी महाराष्ट्र-कर्नाटक दोन्ही राज्याच्या आंतरराज्य बस सेवेवा बंद ठेवण्यात आल्या. याचे पडसाद महाराष्ट्रात उमटण्यास सुरुवात झाली आहे. कोल्हापूर - महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद वाढताना पाहायला मिळत आहे.

पुण्यात काल शिवसेना उबाठा गटाकडून या घटनेचा तीव्र आंदोलन करून तीव्र निषेध काल केला होता. कर्नाटकात मराठी ड्रायव्हरला झालेल्या मारहाणीचा निषेध करत पुण्यात कर्नाटकच्या बसला काळे फासले आहे. पुण्यातील स्वारगेटमध्ये शिवभक्तांचं आंदोलन करण्यात आले.

कर्नाटकमध्ये मराठी ड्रायव्हरचालकावर झालेल्या हल्ल्याचा निषेधार्थ काल रात्री स्वारगेटमध्ये शिवभक्तांच्या माध्यमातून निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं. यावेळी बसला काळें फासण्यात आलं. कर्नाटकमध्ये महाराष्ट्रातील बस चालकाला कन्नड येत नाही म्हणून मारहाण करण्यात आली, बसची तोडफोड करण्यात आली, याचा निषेध म्हणून स्वारगेटमध्ये काल रात्री आंदोलन करण्यात आलं.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ganesh Festival 2025 : गणेशोत्सवापूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना पगाराचा गोड प्रसाद

Manikrav Kokate : रिओ वर्ल्ड चॅम्पियनशिपपूर्वी जिनॅस्ट संयुक्ताला क्रीडामंत्र्यांचा फोन; 'महाराष्ट्राची हिरकणी' म्हणून संबोधत गौरविले

Palghar Gas Leak : बोईसर तारापूर MIDC मध्ये पुन्हा वायुगळती; 4 कामगारांचा मृत्यू तर 1 जखमी

Ganesh Festival Pune 2025 : बाप्पा पावला! गणेशोत्सवात 24 तास धावणार मेट्रो, एकदा पाहा वेळापत्रक