कोल्हापुरात रुपाली चाकणकरांविरोधात आंदोलन करण्यात आलं आहे. 'आम्ही भारतीय महिला मंच' च्या वतीने शाहू समाधी स्थळ इथं मूक निदर्शने करण्यात आली. महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा. ही मागणी या मूक निदर्शना दरम्यान करण्यात आली.
साताऱ्यामध्ये डॉ. संपदा मुंडे या महिला डॉक्टर ने मानसिक आणि शारीरिक छळामुळे आत्महत्या केली. आरोपीला वाचवण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत आहे. खुद्द महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची भूमिकाच शंकास्पद वाटत आहे.
त्यांनी कोणतीही चौकशी पूर्ण होण्याच्या अगोदर डॉक्टर महिलेच्या चारित्र्यावर शिंतोडे ओढण्याचे काम केले आहे. ही बाब अतिशय गंभीर असून नैतिकदृष्ट्या योग्य नाही. त्यामुळे त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी आम्ही भारतीय महिला मंचच्या वतीन करण्यात आली.