सूरज दहाट, अमरावती
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अमरावती येथे काँग्रेस नेत्या व आमदार यशोमती ठाकूर यांनी अभिवादन केलं. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत आक्रमक प्रतिक्रिया दिली.
या देशात सत्ताधारी संविधानाचा सन्मान करत नाही, संविधानाची तोडफोड करून राज्य सरकार स्थापन झाला आहे संविधान विपरीत सरकार वागत आहे त्यामुळे अशा लोकांना बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचा अधिकार नाही संविधानाचा अपमान करून बाबासाहेबांना अभिवादन करून असे नाटक करत आहे त्याचा मी निषेध करतो अशी प्रतिक्रिया यशोमती ठाकूर यांनी दिली.