थोडक्यात
एसटी तिकीट दरवाढी विरोधात आज ठिकठिकाणी आंदोलन
लातूर, छ. संभाजीनगर, नांदेड शहरातील बस स्थानकात आंदोलन
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सकाळी 11 वाजता आंदोलन केलं जाणार
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळकडून 15 टक्क्यांची भाडेवाढ करण्यात आलेली आहे. एसटी महामंडळाकडून 15 टक्के भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला देण्यात आला होता.
याच पार्श्वभूमीवर लातूर, छ. संभाजीनगर, नांदेड शहरातील बस स्थानकात आंदोलन करण्यात येणार असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने हे आंदोलन करण्यात येणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सकाळी 11 वाजता हे आंदोलन करण्यात येणार आहे.