आज एसटी कर्मचाऱ्यांकडून राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे. प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी एसटी कामगार संघटनेकडून आज राज्यभर निदर्शने करण्यात येणार आहेत.
मुंबईमध्ये सेंट्रल मध्यवर्ती कार्यालयावर निदर्शने करण्यात येणार असून आपल्या प्रलंबित आर्थिक व इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र एस टी कामगार संघटना राज्यभर आंदोलन करणार आहे.
कामगारांची उरलेली थकबाकी त्वरित देण्यात यावी, महागाई भत्ता, वार्षिक वेतनवाढीचा टक्क्यांवरुन कर्मचारी आक्रमक झाले आहेत. पूर्वीप्रमाणेच 5 रुपयांच्या पटीत सुधारित भाडेवाढ लागू करावी, अशी मागणी देखील एसटी कामगार संघटनेने केली आहे.