थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Iran Protest) महागाईच्या विरोधात इराणमध्ये संघर्ष सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. वाढत असलेल्या महागाईच्या मुद्द्यावर इराणमध्ये निदर्शने सुरू केली आहेत. 28 डिसेंबर रोजी इराणमध्ये ही निदर्शने सुरू झाली.
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी अमेरिका आणि इस्रायलवर ही अस्थिरता पसरवण्याचा आरोप केला आहे. याच पार्श्वभूमीवर इराणमध्ये गेल्या काही दिवसांपासून जे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
या आंदोलनादरम्यान आतापर्यंत सुमारे 500 सुरक्षा कर्मचाऱ्यांसह किमान 5 हजार लोकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती या भागातील एका इराणी अधिकार्याने दिल्याची माहिती मिळत आहे. यातच या संघर्षात हजारो लोकांचा मृत्यू झाल्याचेही इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी मान्य केले आहे.