murder  Team Lokshahi
ताज्या बातम्या

PUBG खेळण्यास नकार दिल्यावर आईला गोळ्या घातल्या: मुलगा म्हणतो, मारल्याचे दु:ख नाही

इलेक्ट्रेशियनने आईचा खून केल्याची बनवली कथा

Published by : Team Lokshahi

लखनऊ :

उत्तरप्रदेशच्या लखनऊमधून एक 16 वर्षीय मुलाने आपल्याच आईची हत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. केवळ ऑनलाईन गेम खेळण्यासाठी नकार देत असल्याने व अभ्यास करण्यासाठी सांगत असल्याने अल्पवयीन मुलाने आईचा खून केल्याचे समजत आहे. साधना असे मृतकाचे नाव आहे. या बातमीने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

आईला ठार केल्यानंतर तो काही काळजी न करता पार्टी करत राहिला. या दरम्यान त्याने बहिणालीही धमकवेल. मृतदेहाचा वास लपवण्यासाठी तो रुम फ्रेशनर फवारत राहिला. हे रहस्य उघड झाल्यानंतर पोलिसांना त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपी मुलाला कोणताही पश्चाताप नाही.

लखनऊमधील वृंदावन कॉलनीमध्ये 16 वर्षीय आरोपी, त्याची आई व 10 वर्षीय बहिण राहत असते. त्याचे वडील सैन्यात कार्यरत आहेत. 7 जून रोजी आरोपीने आपल्याच वडिलांच्या बंदूकीने आईची हत्या केली. या बंदुच्या आवाजाने बहिणीला जाग आल्याने आरोपीने धमकी तिलाही दिली. मुलाच्या वडिलांनी पाच दिवसांत 50 कॉल केले. मुलाने वडिलांस फोन लावून एका इलेक्ट्रीशनने आईचा खून केल्याचे सांगितले. वडीलांनी तातडीने साधनाच्या भावास कळविले व त्याने पोलिसांत माहिती दिली. पोलिसांनी मृतदेह पाहताच साधनाचा खून दोन-तीन दिवसांपूर्वी झाला असल्याचे समजले. तसेच, आरोपीची 10 वर्षीय बहिणही घाबरलेली असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी अधिक विचारपूस केली असता आरोपीचा बनाव लक्षात आला.

मुलाचे पोलिस चौकशीतील प्रश्नोत्तरे-

प्रश्न - तू असे का केले?

मुलाने उत्तर दिले नाही

प्रश्न- पोलिसांनी पुन्हा विचारले?

उत्तर- आई रोक-टोक खूप करायची. खेळ खेळण्याची परवानगी नव्हती.

प्रश्न- तू आईला कसे मारले?

उत्तर- रात्री झोपताना. जेव्हा आई झोपली तेव्हा वडिलांच्या पिस्तुलाने गोळी झाडली.

प्रश्न- पोलीस पकडतील याची भीती वाटत नाही?

उत्तर- नाही

प्रश्न- तू तुझ्या बहिणीला काय सांगितलेस?

उत्तर- मी तिला सांगितले की, आईबद्दल कोणाला सांगितले तर मी तुलाही असेच मारून टाकीन, तू गप्प बस.

प्रश्न- तू फोनमध्ये कोणता गेम खेळत होता

उत्तर- ऑनलाइन गेम्स. PUBG, Fighter इंस्टाग्रामवर राहत होते. मला आवडत होते. पण आई खेळू देत नव्हती. त्यामुळे राग येत होता.

प्रश्न- वडिलांनी मारले असते तर त्यांनाही गोळी मारली असती का?

उत्तर- तेव्हा पहिले असते, आता काय सांगू.

प्रश्न- तुला तुरुंगात टाकले जाईल, वाटले नाही का?

उत्तर- नाही, मी हा विचार केला नाही.

प्रश्न- मित्रांसोबत पार्टी का केली?

उत्तर- मी रात्री घाबरलो होतो आणि खूप दिवसांपासून चित्रपट पाहिला नव्हता, तेव्हा ते मला सांगत होता, चला चित्रपट पाहू.

प्रश्न- तू तुझ्या बहिणीसाठी जेवण कुठून आणलेस?

उत्तर- स्कूटीने जाऊत तिच्यासाठी जेवण आणत होतो.

प्रश्न- घरी जेवण केले का?

उत्तर- होय, जे बहिणीला आवडत होते, ते जेवण केले.

प्रश्न- आता आई तर तुला दुःख नाहीसृ?

उत्तर- नाही

प्रश्न- तुम्हाला घरी फोन यायचा, तर तुम्ही काय सांगितले?

उत्तर- माझ्याकडे आईचा फोन होता, त्या फोनवर फोन आला तर मी तिला म्हणायचो आई आजीला भेटायला गेली आहे.

प्रश्न- तू तुझ्या वडिलांचा फोन का उचलला नाहीस?

उत्तर- उचलला होता. जेव्हा त्यांचे जास्त कॉल्स आले तेव्हा त्यांना सर्व सांगितले.

प्रश्न- मोबाईलमध्ये पॉर्न पाहायचा का?

उत्तर- माझे मित्र बघायचे, त्यांना कोणी सांगायचे नाही.

प्रश्न: कथा का बनवली गेली?

उत्तर- मला वाटले कोणाला कळणार नाही.

वडिलांना मुलाला क्षमा का करावीशी वाटते?

आरोपी मुलाला माफ करण्याची विनंती वडिलांनी केली आहे. बायको गेली, आता एकुलता एक मुलगा जाऊ नये, असे ते म्हणाले. मात्र, वडिलांच्या या विनंतीवरून पोलिसांनी कायदेशीर कारवाईचा हवाला दिला.

नवीनकुमार राजपुताना बटालियनमध्ये

नवीन कुमार सिंह पश्चिम बंगालमधील आसनसोल येथे 21 राजपुताना बटालियनमध्ये होते. ते म्हणाले, 'शुक्रवार सकाळी 8 वाजता मी साधनाला फोन केला. तो तिच्याशी शेवटचा संवाद होता. त्यानंतर संध्याकाळी कॉल केले. परंतु घेतले नाही. तब्बल 50 कॉल केल्यावरही उत्तर मिळाले नाही. तेव्हा मला संशय आला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी नावाचे वादळ पुन्हा जोमात, 52 चेंडूत 10 चौकार अन् 7 षटकारांसह इंग्लंडला चोपल

Eknath shinde On Thackeray vijayi melava : "...त्यासाठी मनगटात जोर लागतो", ठाकरेंच्या विजयी मेळाव्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

Raj Thackeray : भाषणानंतर राज ठाकरेंनी व्यक्त केली होती दिलगिरी, कारण ऐकून बसेल धक्का...

Devendra Fadanvis On Vijayi Melava : विजयी मेळाव्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मानले खोचक आभार ; म्हणाले, "मला जबाबदार धरलं त्यासाठी..."