crime Team Lokshahi
ताज्या बातम्या

'स्वत:चा धर्म सोडा आणि येशूची पूजा करा'; आळंदीमध्ये काही जणांकडून धर्म परिवर्तनाचा प्रयत्न

आळंदीमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. आळंदी मध्ये काही जणांचा धर्म परिवर्तन करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडलीय.

Published by : Siddhi Naringrekar

सुशांत डुंबरे, पिंपरी चिंचवड

आळंदीमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. आळंदी मध्ये काही जणांचा धर्म परिवर्तन करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडलीय. तक्रारदार पाच वर्षापासून स्मशानभूमीत काम करतात. तक्रारदार घरात असताना तीन व्यक्ती त्यांच्या घरात शिरल्या. त्यांनी तक्रारदार आणि आजूबाजूच्या लोकांमध्ये अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रयत्न केला. तुमचे सगळे आजार ख्रिश्चन धर्माच्या प्रार्थनेने बरे करतो असं सांगितलं. घरातील सर्व देव टाकून द्या त्यानंतर तुमच्या जीवनातील सगळे आर्थिक आणि आरोग्याच्या समस्या दूर करण्यासाठी येशू ख्रिस्तांची पूजा करायला सांगितलं.

या प्रकरणी आळंदी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुम्ही तुमचा धर्म सोडून द्या, आणि येशूची पूजा करा असं सांगत तुम्ही येशूचे रक्त प्या पूजा करा, असं करायला सांगितल्याचे तक्रारीत म्हटलं आहे. या प्रकरणी आळंदीमध्ये 3 जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिस तपास सुरू आहे. तुमचे देव फेकून द्या. मातंग समाजाचे देव भंगार आहे. तुमचे देव टाकून दिले तर तुम्हाला दवाखान्यात जाण्याची गरज नाही. असं म्हणत त्यांनी येशूचं रक्त म्हणून अनेकांना द्राक्षाचं पाणी पाजल्याचा प्रकारही केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.

आम्ही तुम्हाला आजारांपासून बरं करु. येशू ख्रिस्तांकडे चांगले मंत्र आहेत. आमच्या प्रार्थना श्रेष्ठ आहे, असं सांगून तक्रारदार आणि त्यांच्या परिसरात राहणाऱ्या लोकांना मानसिक त्रास दिला आहे. त्यासोबतच मातंग धर्माचा अपप्रचारही केला आहे. त्यावेळी हा प्रकार कोण करत आहे, याची खात्री तक्रारदारांनी केली. सुधाकर सुर्यवंशीने हा प्रकार केल्याचं उघड झालं.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Navi Mumbai : नवी मुंबईतील तुर्भेच्या गोडाऊनला भीषण आग

Latest Marathi News Update live : हार्बर आणि ट्रान्स हार्बर रेल्वे वाहतूक बंद

Harbour Line : हार्बर आणि ट्रान्स हार्बर रेल्वे वाहतूक बंद

Latest Marathi News Update live : पुण्यात अमली पदार्थांचा सुळसुळाट