Admin
ताज्या बातम्या

पुण्यात सत्तासंघर्षावर बॅनरबाजी; सरन्यायाधीशांना उद्देशून लिहिले फ्लेक्स

महाराष्ट्रात सध्या सत्तासंघर्षावरुन वातावरण चांगलेच तापले आहे.

Published by : Siddhi Naringrekar

महाराष्ट्रात सध्या सत्तासंघर्षावरुन वातावरण चांगलेच तापले आहे. यावरुन शिंदे ठाकरे एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप करत आहेत. यातच आता पुण्यात सत्तासंघर्षावरच बॅनरबाजी करण्यात आली आहे. सत्तासंघर्षाची सुनावणी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यांचा खंडपीठाकडे सुरु होती.

ही सत्तासंघर्षाची सुनावणी आता पूर्ण झाली आहे. मात्र आता चर्चा रंगली आहे ती म्हणजे पुण्यातील बॅनरबाजीची पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. यात बॅनरमध्ये थेट सरन्यायाधीशांना उद्देशन फ्लेक्स लिहिले गेले आहे.सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना लोकशाही वाचवण्यासाठी विनंती केली आहे.

बॅनरवर लिहिले आहे की, जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून आपला भारत देश ओळखला जातो. आपण सर्व जाती धर्मातील लोक हे गर्वाने सांगतो. परंतु अलीकडच्या काळात सत्ताधाऱ्यांकडून सत्तेचा केलेला गैरवापर आदी गोष्टींमुळे आपल्या देशात खरच लोकशाही उरली का? असा देशील प्रश्न पडतो. दिवसा ढवळ्या लोकशाही गाडून टाकण्याचा प्रयत्न महाराष्ट्राच्या जनतेने उघड डोळ्यांनी पाहिले आहे. सत्ताधारी दडपशाहीने अधिकारांचा गैरवापर करुन हुकूमशाहीला पूरक असे वातावरण करत आहेत. अशा परिस्थितीत तमाम भारतातील जनता आपल्याकडे न्यायाची आस लावून बसली आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा लढा लोकशाहीच्या दृष्टिकोनातून अंत्यत महत्वाचा आहे. आपण लोकशाही वाचवण्यासाठी योग्य तो निर्णय द्याल, याची खात्री आहे. अन्यथा भारतातील हुकूमशाहीची ही सुरुवात असेल, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. असा आशयाचे हे बॅनर आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा