ताज्या बातम्या

Vaishanvi Hagwane Case : वैष्णवी हगवणे प्रकरणात फॉर्च्युनर गाडी बावधन पोलिसांकडून जप्त

या गाडीची चावी लग्नाच्या दिवशी स्टेजवर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते हगवणे कुटुंबाला प्रदान करण्यात आली होती.

Published by : Shamal Sawant

वैष्णवी हगवणे प्रकरणात तपासादरम्यान महत्त्वपूर्ण बाब उघडकीस आली असून MH १४ KU २०२२ क्रमांकाची टोयोटा फॉर्च्युनर गाडी बावधन पोलिसांनी आता जप्त केली आहे. सदर गाडी टॉप मॉडेल असून उच्च किंमतीची आहे. ही गाडी वैष्णवीच्या विवाहप्रसंगी तिच्या वडिलांनी हगवणे कुटुंबाला मुलीला सुख लाभावं, या भावनेतून दिली होती. विशेष म्हणजे, या गाडीची चावी लग्नाच्या दिवशी स्टेजवर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते हगवणे कुटुंबाला प्रदान करण्यात आली होती.

तपासादरम्यान पोलिसांनी या गाडीचा तपशील, कागदपत्रे आणि मालकी हक्क याचा सखोल अभ्यास केला असून सध्या ती पोलिसांच्या ताब्यात आहे. यासोबतच, वैष्णवीच्या वडिलांनी लग्नावेळी सुमारे ५० तोळे सोने हगवणे कुटुंबाला दिले असल्याचीही माहिती समोर आली आहे.

या फॉर्च्युनर गाडीचा कायदेशीर हक्क कोणाकडे आहे याबाबतचा वाद सध्या न्यायालयात आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे बावधन पोलीस ठाण्याचे अधिकारी म्हणाले. या प्रकरणाच्या तपासात पोलिसांकडून प्रत्येक पुरावा सखोलपणे गोळा करून न्यायप्रक्रियेला हातभार लावला जात आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा