विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुणे शहरात आता गुन्हेगारीच्या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसत आहे. स्वारगेट बस स्थानकात 26 वर्षीय तरुणीवर अत्याचाराची घटना घडली असतानाच अजून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यामध्ये खडकी परिसरात एका कॅब चालकाने महिला प्रवाशाबरोबर गैरवर्तन केल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील कल्याणीनगर परिसरात एका 20 वर्षीय कॅब चालकाने महिलेची छेड काढली आहे. कल्याणीनगर येथील एका कंपनीमध्ये काम करणाऱ्या महिलेने घरी जाण्यासाठी कॅब बुक केली. चालक आल्यानंतर ते घराच्या दिशेने जाऊ लागले. मात्र त्याने मध्येच कॅबमध्ये असलेला आरसा फिरवला आणि तिच्याकडे बघून चुकीचं वर्तन करु लागला.
दरम्यान या सगळ्या प्रकारानंतर महिलेने कॅब थांबवण्यास सांगितले आणि गाडीतून उतरताच पीडित महिलेने थेट पोलिस स्थानकात धाव घेतली. तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी 20 वर्षीय आरोपीला ताब्यात घेतले आहे. याबद्दलची माहिती खडकी पोलिस स्थानाकातील पोलिस निरीक्षक गजानन चोरमले यांनी दिली आहे. ते म्हणाले की, "आरोपीचे नाव सुमित कुमार आहे. मूळचा तो उत्तर प्रदेश येथील उन्नावमधील रहिवासी आहे.