आजवर अनेकदा कौटुंबिक वादातून चुकीची पावलं उचलली गेली आहेत. या वादातून कुटुंबातीलच व्यक्तींनी हत्या केल्याच्यादेखील अनेक घटना समोर आल्या आहेत. आशातच आता पुणे जिल्ह्यातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. पुणे येथिल एका 30 वर्षीय महिलेने स्वतःच्याच चिमुकल्या मुलांचा गळा आवळून हत्या केली आहे. या घटणेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. मुलांची हत्या करुन तिने पतीवरदेखील धारधार कोयत्याने वार केले. यामध्ये तिचा पती गंभीर जखमी झाला आहे.
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोलीमध्ये शिंदे वस्तीमध्ये ही भयंकर घटना घडली आहे. चिमुकल्या मुलांच्या हत्येप्रकरणी आता दौंड पोलिसांनी तपास सुरू केला असून आरोपी महिला कोमल दुर्योधन मिंढेला (30) अटक करण्यात आले आहे. ही घटना पती-पत्नीच्या वादातून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सदर घटना घडल्यानंतर दौंड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गोपाळ पवार आणि कुरकुंभ चौकी सहायक पोलिस निरीक्षक नागनाथ पाटील घटनास्थळी दाखल झाले.
नक्की काय घडले?
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेची मुलं शंभू दुर्योधन मिढे (01 वर्ष ) आणि मुलगी पियू दुर्योधन मिढे (03 वर्ष) पहाटे साखरझोपेत असतानाच कोमलने दोघांचे आयुष्य संपवले. चिमूरडी मुलं झोपेत असतानाच कोमलने त्यांचा निर्दयीपणे खून केला. मात्र इतक्यावरच न थांबता तिने पती दुर्योधन आबासाहेब मिढेवर (35 वर्ष) धारधार कोयत्याने मानेवर व हातावर सपासप वार केले. यामध्ये तिचा पती गंभीर जखमी झाला.
या प्रकरणाचा तपास आता पोलिस करत आहेत. मात्र समोर आलेल्या माहितीनुसार,दुर्योधन मुंढे हे आयटी इंजिनिअर असून पुण्यातील खराडी येथील एका आयटी कंपनीत कामाला आहेत. पती-पत्नीच्या वादामुळे आणि सासरच्या जाचाला कंटाळून कोमलने हे टोकाचं पाऊल उचलल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी आता पुढे अजून कोणती माहिती मिळणार? तसेच निर्दयी आईला कोणती शिक्षा होणार? याबद्दल सर्वत्र चर्चा सुरू आहे. त्याचप्रमाणे या निर्दयी आईला कठोर शिक्षा व्हावी असेही सगळे म्हणत आहेत.