राज्यात 'गुलेन बॅरी सिंड्रोम'च्या रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहेत. राज्यात 'गुलेन बॅरी सिंड्रोम'मुळे चिंता वाढली आहे. पुण्यात 'जीबीएस'मुळे आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत असून पुण्यात जीबीएसमुळे नववा मृत्यू झाला आहे.
वाघोली येथील 34 वर्षीय पुरुषाचा ससून रुग्णालयात मृत्यू झाल्याची माहिती मिळत असून या रुग्णाला श्वसनाचा त्रास झाला होता. ससून रुग्णालयात 3 फेब्रुवारीपासून त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र त्रास वाढत गेला आणि उपचारादरम्यान या रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
पुण्यात जीबीएसचे एकूण 210 रुग्ण आहेत तर 41 रुग्ण आयसीयूत आणि 20 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.