अमोल धर्माधिकारी, पुणे
पुण्यातील कल्याणीनगरमध्ये एका बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत भरधाव वेगाने गाडी चालवत दुचाकीला धडक दिली, त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला.
याच पार्श्वभूमीवर आता विशाल अग्रवालला पुन्हा अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुणे पोलीस विशाल अग्रवालची पोलीस कोठडी कोर्टाकडे मागणार असल्याची माहिती मिळत आहे.
विशाल अग्रवाल हा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. ड्रायव्हरला धमकवल्याप्रकरणी विशालवर कलम 365, कलम 368 दाखल करण्यात आले आहे.