बॉलिवूड आणि पंजाबी गायक हनी सिंगच्या बाबतीत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुण्यातील खराडी परिसरात हनी सिंगचा लाईव्ह कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला होता. पण या कॉन्सर्टसाठी अधिक गर्दी उसळल्याने मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला. यावेळी गर्दी आवरताना पुणे पोलिसांना गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लाठीचार्ज करावा लागल्याचे समोर आले आहे.
हनी सिंगच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने तरुण-तरुणी आले होते. आतमध्ये हनी सिंगच्या कार्यक्रमाचा आवाज येत होता. पोलिसांनी तरुणांना आतमध्ये जाण्यासाठी दरवाजा उघडला आणि लगेच गर्दीचा मोठा लोंढा आतमध्ये शिरताना दिसला. मात्र त्यावेळी मोठ्या प्रमाणात गोंधळदेखील उडाला.
हनी सिंगला लाईव्ह गाण्यांचा कार्यक्रम आज पुण्यात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला इतकी गर्दी आली की पोलिसांना गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला.
गायक हनी सिंगचे जगभरात लाखो चाहते आहेत. हनी सिंग हा त्याच्या रॅप साँगमुळे प्रचंड लोकप्रिय आहे. हनी सिंग गेल्या काही वर्षांमध्ये आजारी होता. 8 ते 10 वर्षांनी त्याने पुन्हा कमबॅक केलं आहे. हनी सिंगला जीवे मारण्याची धमकीदेखील देण्यात आली होती. त्यामुळे हनी सिंग हा दुबईत स्थायिक झाल्याची माहिती होती. पण आता हनी सिंग याचे लाईव्ह कार्यक्रम भारतात होताना दिसतात.