लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळ पार्क केलेल्या कारमध्ये झालेल्या भीषण स्फोटाने राजधानी हादरली आहे.
स्फोटानंतर कारला आग लागली आणि शेजारील काही वाहनांनाही पेट घेतला. या घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला असून, अनेक वाहने पूर्णपणे जळून खाक झाली आहेत.
स्फोटाचा आवाज 200 ते 300 मीटरपर्यंत ऐकू गेला, ज्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं.
घटनेनंतर पोलिस, अग्निशामक आणि बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. सायंकाळी सुमारे 6.45 वाजता हा स्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे.
या घटनेनंतर दिल्लीसह देशातील प्रमुख महानगरांमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.
केंद्रीय गुप्तचर विभागाच्या सूचनेनुसार मुंबई आणि पुणे शहरातही हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.
सार्वजनिक ठिकाणी पोलिसांचा तैनात वाढविण्यात आला असून, वाहतूक आणि मेट्रो स्थानकांवर कसून तपासणी सुरू आहे.
स्फोटाचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. प्राथमिक तपासात तांत्रिक बिघाड की घातपात, याबाबत चौकशी सुरू आहे.
सुरक्षा यंत्रणांकडून संपूर्ण घटनेचा सखोल तपास सुरू असून, अधिकृत माहिती लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.