ब्ला ब्ला कार ॲप सारख्या इतर तत्सम ॲप द्वारे अवैध प्रवासी वाहतुकीची तपासणी करण्याचे आदेश पुणे प्रादेशिक परिवहन विभागाकडून देण्यात आले आहेत. एरवी एकट्यासाठी चारचाकी गाडी काढून मुंबई पुण्याला प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कार पुलिंग करून पैसे वाचवण्याची सुविधा ब्ला ब्ला ॲपेने उपलब्ध करून दिली होती.
मुंबई, पुणे आणि नाशिक या शहरांमध्ये रोज प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांना ही मोठी सोय झाली होती. त्यातच पैशांची, इंधनाची बचत अशा कारणांमुळे अगदी कमी वेळेत हे ॲप प्रचंड लोकप्रिय झालं आणि त्याला प्रतिसाद ही मोठ्या प्रमाणावर मिळाला पण आता आर टी ओ ने म्हणजेच परिवहन विभागाने एक नवा आदेश जाहीर केला आह
ब्ला ब्ला कारचे पिकअप पॅाईंट शोधून काढण्यासाठी खोटे प्रवाशी म्हणून नोंदी करून प्रवास करा आणि त्यानंतर कारवाई करा अश्या सूचना सुद्धा देण्यात आल्या असून त्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.
कारवाई करण्यासाठी रस्ता सुरक्षा पथकाला पुण्यातील नवले पूल, चांदणी चौक, स्वारगेट, पुणे स्टेशन यासारख्या आणखी काही ठिकाणी पथके तैनात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या ॲप सारख्या इतर ॲप द्वारे बुकिंग केलेल्या खाजगी वाहनांची तपासणी सुद्धा केली जाणार आहे. या वाहनांवर आता ई चलन द्वारे ही कारवाई होणार असल्याचे आदेशात नमूद केले आहे.