Pune Crime : पुण्यात पोलिसांची धडक कारवाई! SPA सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु Pune Crime : पुण्यात पोलिसांची धडक कारवाई! SPA सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु
ताज्या बातम्या

Pune Crime : पुण्यात पोलिसांची धडक कारवाई! SPA सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु

पुणे पोलिसांची धडक कारवाई! प्रसिद्ध स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसायावर छापा.

Published by : Team Lokshahi

Pune Police Takes Action Against Prostitution at a Famous SPA Center in Pune : पुण्यातील प्रसिद्ध स्पा सेंटरवर वेश्या व्यवसायाप्रकणी पुणे पोलिसांकडून आज अचानक धाड टाकण्यात आली. या प्रकरणात परदेशी मुलींचाही समावेश असल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. यामधील थायलंडच्या 10 मुलींची यातून यशस्वी सुटका करण्यात आली आहे. स्पा सेंटरवर चाललेल्या अश्या अश्लील कृत्यामुळे पुण्यातील विमानतळ आणि बाणेर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पुण्यामध्ये सध्या वैश्या व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालत असल्याचे चित्र आहे. गरीब , लहान आणि असहाय्य् मुलींना कामाचे आणि पैशांचे अमिष दाखवून त्यांना या देहविक्रीच्या व्यवसायात अनाहूतपणे ढकलले जाते. याच प्रकरणाचा शोध घेत पुणे पोलिसांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. पुण्यातील परिमंडळ 4 अंतर्गत येणाऱ्या विमानतळ परिसर आणि उच्चभ्रू अश्या बाणेर परिसरातील मसाज सेंटरवर अचानक छापे टाकल्यावर एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मसाज करण्याच्या बहाण्याने तिथे वेश्या व्यवसाय चालू असल्याचे उघड झाले. विशेष म्हणजे या व्यवसायात परदेशी महिलांचा समावेश आढळून आला. विमानतळ परिसरातील केलेल्या कारवाईमध्ये एकूण 18 मुलींची सुटका करण्यात आली, त्यातील 10 महिला या चक्क थायलंडमधल्या असल्याचे उघड झाले. तर 2 महिला या भारतीय आहेत. त्याचबरोबर बाणेर परिसरात जी कारवाई करण्यात आली. 15 आणि 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलींचाही समावेश असल्याचे उघड झाले आहे. यामध्ये 5 मुलींची सुटका करण्यात आली आहे.

या प्रकरणात स्पा सेंटरच्या जागा मालकासह, स्पा सेंटर मालक आणि मॅनेजर आणि किरण ऊर्फ अनुराधा बाबूराव आडे या महिलेला अटक करण्यात आली असून, तिच्यावर पीटा कायदा, पोक्सो कायदा कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अश्या वेश्याव्यसायाचे रॅकेट पुणे पोलिसांनी मोठ्या शिताफीने उघड केले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : कॅलिफोर्नियात भारतीय तरुणाची हत्या

Russia : रशियाचा युक्रेनवर 805 ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला

Himachal Rain : हिमाचलमध्ये पावसाचा कहर; 4 हजार कोटींचं नुकसान

Cooper Hospital : कूपर रुग्णालयात आणखी एका रुग्णाला उंदराचा चावा