Vishal Agarwal Case Update 
ताज्या बातम्या

Pune Car Accident Update : पुणे हिट अँड रन प्रकरणात विशाल अग्रवालला तीन दिवसांची पोलीस कोठडी

पुण्यात कल्याणी नगरमध्ये मद्यधुंद अवस्थेत कार चालवून दोन जणांचा बळी घेणाऱ्या अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अगरवालला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.

Published by : Naresh Shende

Pune Hit And Run Case Vishal Agarwal Update : पुण्यात कल्याणी नगरमध्ये मद्यधुंद अवस्थेत कार चालवून दोन जणांचा बळी घेणाऱ्या अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवालला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. अगरवालला पुण्याच्या सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. पुणे हिट अँड रन प्रकरणी न्यायालयाने बिल्डर विशाल अग्रवालला ही कारवाई केली आहे. विशाल अगरवाल याच्यासह बार मालक, व्यवस्थापक नितेश शेवानी आणि जयेश गावकरे यांच्यावरही अटकेची कारवाई करण्यात आलीय. सरकारी वकिलांनी विशाल अग्रवालला पोलीस कोठडी देण्याबाबत न्यायालयात मागणी केली होती.

वंदे मातरम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विशाल अग्रवाल केली शाईफेक

पुण्यात सत्र न्यायालयात परिसरात अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवालवर शाईफेक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. वंदे मातरम संघटना विशाल अगरवाल विरोधात आक्रमक झाल्याचं समोर आलं. विशाल अग्रवाल पोलीस व्हॅनमधून न्यायालयात नेत असताना त्यांच्यावर शाईफेक केल्याचा प्रकार समोर आला. त्यामुळे न्यायलय परिसरात एकच गोंधळ उडाला होता. संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्नही केला होता.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा