ताज्या बातम्या

Pune Water cut Updates: पुणेकरांचं टेन्शन वाढलं! महापालिकेची रोटेशन पद्धतीने पाणीकपात; कोणत्या विभागात कधी पाणी येणार?

शहरात उन्हाळ्याचा कडाका वाढत असतानाच पुणेकरांना आता पाणीकपातीच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे.

Published by : Rashmi Mane

शहरात उन्हाळ्याचा कडाका वाढत असतानाच पुणेकरांना आता पाणीकपातीच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. आजपासून महापालिकेच्या वतीने शहरातील विविध भागांमध्ये टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा बंद ठेवण्याची योजना राबवण्यात येणार आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

दक्षिण पुण्यात आजपासून रोटेशन पद्धतीने पाणी कपात सुरू होणार असून सिंहगड रस्ता, सहकार नगर, धनकवडी, बालाजीनगर, आंबेगाव पठार, दत्तनगर, संतोषनगर, कात्रज, भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा बुद्रुक हे भाग यामध्ये येणार आहेत. वडगाव जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी मिळणाऱ्या भागांमध्येही उद्यापासून पाणीपुरवठा मर्यादित स्वरूपात होणार आहे.

महापालिकेच्या माहितीनुसार, पाणीटंचाई आणि पाण्याची वाढती मागणी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. काही भागांत पाणी कमी दाबाने येईल, तर काही ठिकाणी टँकरद्वारे पुरवठा केला जाईल. नागरिकांनी पाण्याची योग्य ती साठवणूक करावी व गरज नसताना पाणी वाया घालवू नये, असे प्रशासनाचे आवाहन आहे.

पाणीकपातीच्या या कालावधीत नागरिकांनी सहकार्य करावे आणि पाणी जपून वापरण्याच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

रोटेशननुसार आठवड्यातील पाणीकपातीचे वेळापत्रक -

सोमवार : बालाजीनगर, गुरु दत्त सोसायटी, उत्कर्ष सोसायटी, साईनगर, श्रीकृष्ण सोसायटी, कात्रज तलावाजवळचा परिसर

मंगळवार : सनसिटी, जुनी धायरी, राजस सोसायटी परिसर, खडी मशीन चौक, सिंहगड कॉलेज परिसर

बुधवार : वडगाव, आनंद नगर, हिंगणे, आंबा माता मंदिर, वाघजाई नगर, सुख सागर भाग २

गुरुवार : धनकवडी गावठाण, टिळकनगर, स्वामी समर्थ नगर, काकडे वस्ती

शुक्रवार : आंबेगाव पठार (सर्वे नं. १५ ते ३०), भारती विद्यापीठ मागील भाग, दत्तनगर, वटेश्वर मंदिर, जांभूळवाडी रस्ता

शनिवार : गुजरवाडी फाटा, राजीव गांधी वसाहत, कात्रज गाव, काकडे वस्ती

रविवार : महादेव नगर, विद्यानगर, पारघे नगर, अश्रफ नगर

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा