ताज्या बातम्या

गंभीर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पुण्यात 'एक गाव एक पोलीस' योजना सुरू

पुणे ग्रामीण पोलीस विभागात "एक गाव, एक पोलीस" ही अभिनव योजना राबविण्यात आली आहे.

Published by : Team Lokshahi

पुणे ग्रामीण पोलीस विभागात "एक गाव, एक पोलीस" ही अभिनव योजना राबविण्यात आली आहे. या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील 1574 गावांमध्ये पोलिसांची नियमित उपस्थिती सुनिश्चित करण्यात येणार असून, गावागावातील वाड्यावस्त्यांपर्यंत पोलीस पोहोचणार आहेत.

या योजनेच्या माध्यमातून पोलीस आणि ग्रामस्थ यांच्यातील संवाद अधिक सशक्त करण्यात येणार असून, गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रभावी पावले उचलली जाणार आहेत. या संकल्पनेमागे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांचे नेतृत्व असून, 13 तालुक्यांतील 33 पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात ही योजना राबविली जात आहे. योजनेच्या अंमलबजावणीत 1292 पोलीस पाटील आणि 1524 पोलीस कर्मचारी सहभागी झाले आहेत. ‘सुरक्षित पुणे ग्रामीण’ या मोबाइल ॲपच्या साहाय्याने या योजनेची नोंदणी करण्यात आली आहे. या ॲपमुळे पोलीस पाटील आणि कर्मचाऱ्यांना स्थानिक घडामोडी, कायदा-सुव्यवस्था, तसेच त्यांच्या गस्त आणि भेटी यांचे दस्तऐवजीकरण करता येणार आहे.

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गावातील महिला, मुलं आणि दुर्बल घटकांच्या सुरक्षेसाठी हा उपक्रम फायदेशीर ठरणार आहे. गंभीर गुन्ह्यांची माहिती लवकर मिळाल्यास त्वरित कारवाई शक्य होईल. या योजनेमुळे नागरिकांमध्ये पोलिसांविषयी विश्वास वाढेल आणि समाजात सुरक्षिततेची भावना बळावेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. या उपक्रमामुळे पुणे ग्रामीण विभागात कम्युनिटी पोलिसिंगचा एक मजबूत पाया तयार होईल, असे मत पोलिसांकडून व्यक्त करण्यात आले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा