Pune Weather Cold Wave Increase Next Few Days People Wear Sweater Latest Weather Updates 
ताज्या बातम्या

Weather Update : थंडीचा धमाका पुण्यात! पुढील 48 तास गारठा कायम, हवामान कसे असेल?

पुढील दोन दिवस हवामानात फारसा बदल होणार नसल्याचा अंदाज आहे. त्यामुळे पुणे आणि आसपासच्या भागात गारठा कायम राहणार आहे.

Published by : Riddhi Vanne

Maharashtra Weather : गेल्या काही दिवसांत पुणे शहरात थंडीचा जोर वाढलेला जाणवत आहे. विशेषतः रात्री आणि पहाटे वातावरण अधिक गार होत असून, पुढील दोन दिवस हवामानात फारसा बदल होणार नसल्याचा अंदाज आहे. त्यामुळे पुणे आणि आसपासच्या भागात गारठा कायम राहणार आहे.

दिवसा ऊन चांगले तापत असले तरी सकाळी व संध्याकाळी थंड हवा जाणवते. त्यामुळे नागरिकांना थंडी आणि उष्णता असा दुहेरी अनुभव येत आहे. आकाश बहुतेक वेळा स्वच्छ राहणार असून सकाळच्या वेळी हलके धुके पडण्याची शक्यता आहे.

गुरुवारपासून तापमानात हळूहळू वाढ होईल, मात्र तोपर्यंत थंडीचा प्रभाव जाणवत राहणार आहे. राज्यातील इतर भागांप्रमाणेच मुंबईतही यंदा थंडीने हजेरी लावली आहे. रात्रीच्या तापमानात झालेल्या घसरणीमुळे मुंबईकरांनाही बोचरी थंडी अनुभवायला मिळाली. एकूणच, पुढील काही दिवस सकाळ-संध्याकाळ उबदार कपड्यांची गरज भासणार आहे.

थोडक्यात

  1. पुणे शहरात थंडीचा जोर वाढला.

  2. रात्री आणि पहाटे हवामान अधिक गार

  3. पुढील दोन दिवस हवामानात फारसा बदल अपेक्षित नाही.

  4. पुणे आणि आसपासच्या भागात गारठा कायम राहणार

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा