Uttar Pradesh Accident  team lokshahi
ताज्या बातम्या

Uttar Pradesh Accident : यमुना एक्स्प्रेसवर भीषण अपघात; पुण्यातील 5 जणांचा मृत्यू, २ गंभीर

Published by : Shweta Chavan-Zagade

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh ) यमुना एक्स्प्रेसवेवर (Yamuna Expressway) बोलेरो आणि डंपरचा गुरुवारी पहाटे भीषण अपघात झाला आहे. या अपघातात (accident) चार महिलांसह एकूण पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून जेवार टोल प्लाझाच्या अलिकडे 40 किमीच्या परिघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. अपघाताची माहिती मिळताच महामार्गावरील काहींनी त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. अपघातातील मृत आणि जखमी हे पुण्याचे असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

वाहन चालकाला झोप लागल्याने अपघात झाल्याचा संशय

तत्काळ पोलिसांनाही पाचारण करण्यात आलं. मात्र, रुग्णालयात नेल्यानंतर यातील पाच जणांना मृत घोषित करण्यात आलं. सध्या अन्य दोघांवर कैलास रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. सर्व दुर्घटनाग्रस्त व्यक्ती बारामतीच्या असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. त्यातील बहुतेक साठीच्या वयातील आहेत. वाहन चालकाला झोप लागल्याने अपघात झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. चारचाकी ज्या ट्रकला धडकली तो पोलिसांनी जप्त केला आहे.

अपघातांची नावे

चंद्रकांत बुराडे (६८), स्वर्णा बुराडे (५९), मालन कुंभार (६८), रंजना पवार (६०) आणि नुवंजन मुजावर (५३, कर्नाटक) अशी मृतांची नावे असून अन्य दोन व्यक्ती अत्यवस्थ आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा