Ajit Pawar : '...बिल घेऊ नका' चाकण दौऱ्यावर असताना अजित पवारांची मिश्किल टिप्पणी Ajit Pawar : '...बिल घेऊ नका' चाकण दौऱ्यावर असताना अजित पवारांची मिश्किल टिप्पणी
ताज्या बातम्या

Ajit Pawar : '...बिल घेऊ नका' चाकण दौऱ्यावर असताना अजित पवारांची मिश्किल टिप्पणी

अजित पवार चाकण दौऱ्यावर: 'बिल घेऊ नका' मिश्किल टिप्पणीने उपस्थितांना हसवले.

Published by : Team Lokshahi

State Deputy Chief Minister Ajit Pawar visited Chakan city and MIDC area Today : पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज चाकण शहर आणि एमआयडीसी परिसराचा दौरा करून स्थानिक नागरी अडचणींचा आढावा घेतला. विशेषतः, औद्योगिक क्षेत्रातील नागरिक व कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या तीव्र वाहतूक कोंडीबाबत त्यांनी प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पाहणी केली आणि नागरिकांशी चर्चा केली. चर्चेदरम्यान काही नागरिकांनी "चाकणला बारामतीसारखे विकसित करा" अशी मागणी केली. त्यावर अजित पवारांनी, "बारामतीची तुलना चाकणशी करू नका" असे सांगत समजूत घातली. यावेळी त्यांनी चाकणला महानगरपालिका करण्याचा गंभीर विचार सुरू असल्याचे संकेत दिले.

पवार म्हणाले, "चाकण व परिसरात महानगरपालिका करावी लागेल. काहींना आवडेल किंवा न आवडेल, पण हे आवश्यक आहे. आज मी सकाळी ५:४५ वाजता येथे आलो. नॅशनल हायवे, पीएमआरडीए, जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. तळेगाव-शिक्रापूर मार्ग सहा पदरी करण्यासाठी निधी उपलब्ध करून देत आहे. त्यानंतर पुणे-नाशिक मार्ग एलीवेटेड स्वरूपात करण्याचा प्रस्ताव आहे. हे केल्याशिवाय वाहतूक समस्येवर कायमस्वरूपी उपाय होणार नाही. स्थानिकांनी मोठा त्रास सहन केला आहे, आता यातून मुक्तता देऊया" असे त्यांनी नमूद केले.

पवारांची हशा पिकवणारी टिप्पणी या दौऱ्यादरम्यान

स्थानिक हॉटेलमालकांनी त्यांना नाश्त्यासाठी बोलावले असता, पवार म्हणाले, "आज वेळ नाही, पण पुढच्यावेळी आलो की जेवण करेन. तेव्हा मात्र माझं बिल घेऊ नका" अशी मिश्किल टिपणी करून उपस्थितांना हसवले. त्याच वेळी त्यांनी स्पष्ट केले, "हा चेष्टेचा भाग आहे, पण राजकारण आणि व्यवसाय स्वतंत्र ठेवा. कोणीही आले तरी बिल घ्या, नाहीतर हॉटेल बंद करण्याची वेळ येईल."

भाषणात खास शैलीत समाचार

भाषणादरम्यान मध्येच बोलणाऱ्या एका कार्यकर्त्याला त्यांनी आपल्या ओळखीच्या ठसक्यात सुनावले, "आम्ही काय बिनडोक आहोत का? तुम्हालाच सगळं कळतं का?" असा सवाल करत त्यांनी बोलताना अडथळा निर्माण करणाऱ्या व्यक्तीला रोखले. बोलतानाचा हजरजबाबीपणा आणि कायम मिश्किल टिपणी करून विरोधकांना शांत करणारे अजित पवार कायम चर्चेत असतात.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Haider Ali : यश दयालनंतर आणखी एका क्रिकेटपटू मोठ्या अडचणीत! अत्याचाराच्या आरोपाखील थेट पोलिसांच्या ताब्यात

Sanjay Raut : उद्धव ठाकरेंच्या आसनव्यवस्थेवरुन टीका करणारे 'भंपक'; राऊतांची विरोधकांवर टीका

Raksha Bandhan 2025 : रक्षाबंधनानिमित्त भावाला राखी बांधताना किती गाठी बांधाव्या? जाणून घ्या प्रत्येक गाठी मागचा अर्थ

Kapil Sharma : कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; कपिलची सलमान खानसोबत असलेली जवळीक कारणीभूत?