आयपीएल 2025 चा हंगाम शेवटच्या टप्प्यात असताना पॉइंट्स टेबलमध्ये मोठे बदल झाल्याचे पाहायला मिळत आहेत. आयपीएल 2025 च्या 54 व्या सामन्यात पंजाब किंग्जने (PBKS) लखनौ सुपर जायंट्सचा (LSG) 38 धावांनी पराभव केला. यासोबतच पंजाबचा संघ पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. रविवारी झालेल्या सामन्यात पंजाबने 237 धावांचे लक्ष्य लखनौला दिले होते. मात्र लखनौची टीम 199 धावांपर्यंत मजल मारू शकली.
लखनौनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला पंजाबला धक्का दिला. सलामीवीर प्रियांश आर्य काही खास करू शकला नाही आणि 4 चेंडूत 1 धाव केल्यानंतर पहिल्याच षटकात 2 धावांवर आऊट झाला. यानंतर, जोश इंग्लिस आला आणि त्याने काही तुफानी फटके मारले आणि 14 चेंडूत 30 धावा केल्या. पंजाबचा हा 11 सामन्यांतील सातवा विजय आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाने शानदार फॉर्म कायम ठेवत 11 पैकी 8 सामने जिंकून 16 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. तर मुंबई इंडियन्स (MI) सध्या 7 विजयांसह तिसऱ्या स्थानावर आहे.