ताज्या बातम्या

PBKS vs MI in IPL 2025 : आता पंजाब विरूद्ध मुंबईचा सामना होणार 'या' स्टेडियमवर

भारत-पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या तणावपूर्ण वातावरणाच्या पार्श्वभूमीवर आयपीएलच्या सामन्यांवर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.

Published by : Rashmi Mane

भारत-पाकिस्तानमध्ये (Ind vs Pak) सुरू असलेल्या तणावपूर्ण वातावरणाच्या पार्श्वभूमीवर आयपीएलच्या (IPL 2025) सामन्यांवर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. सध्या भारतात विविध ठिकाणी आयपीएलचे सामने खेळवले जात असून 11 मे रोजी होणारा पंजाब किंग्ज (PBKS) विरूद्ध मुंबई इंडियन्सचा (MI) सामन्याची जागा आता बदलण्यात आली आहे. हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, धर्मशाळा येथे होणारा सामना आता गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. याची माहिती पीटीआयच्या एक्स पोस्टद्वारे जारी करण्यात आली असून ही माहिती गुजरात क्रिकेट असोसिएशनचे सचिव अनिल पटेल यांनी दिली आहे.

अनिल पटेल म्हणाले की, "बीसीसीआयने आम्हाला विनंती केली आणि आम्ही ती मान्य केली. मुंबई इंडियन्स आज उशिरा येत आहेत आणि पंजाब किंग्जचे प्रवास नियोजन केले आहे." आयपीएलमधील 74 सामन्यांपैकी हा 61 वा सामना असून हा सामना दुपारी खेळवला जाणार आहे. सध्या पंजाब आणि मुंबई इंडियन्सच्या गुण क्रमांकांमध्ये चुरस पाहायला मिळत असून पंजाब तिसऱ्या तर मुंबई इंडियन्स चौथ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे 11 तारखेला खेळवला जाणारा सामना हा दोघांच्या आयपीएल सामन्यांमधील अस्तित्वासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा