ताज्या बातम्या

E-Cabinet : मंत्रिमंडळासाठी आयपॅड खरेदी; तांत्रिकदृष्ट्या सक्षमतेसाठी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

ई-कॅबिनेट प्रणालीसाठी आयपॅड खरेदी; सरकारची तांत्रिकदृष्ट्या सक्षमतेसाठी पुढाकार

Published by : Shamal Sawant

राज्य सरकारने मंत्रिमंडळासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, ई-कॅबिनेट प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी अ‍ॅपल कंपनीचे आयपॅड व संबंधित उपकरणांची खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या खरेदीसाठी सरकारने एकूण १ कोटी ६ लाख ५७ हजार ५८३ रुपयांचा खर्च केला आहे. यात ५० आयपॅड, ५० मॅजिक कीबोर्ड, ५० अ‍ॅपल पेन्सिल आणि ५० कव्हर्स यांचा समावेश आहे. एका आयपॅडसाठी १ लाख ६५ हजार ८४३ रुपये, मॅजिक कीबोर्डसाठी ३१ हजार १८८ रुपये, अ‍ॅपल पेन्सिलसाठी ७ हजार २६८ रुपये आणि कव्हरसाठी ८ हजार ८५० रुपये इतका खर्च झाला आहे.

या खरेदीसाठी शासनाने ९ एप्रिल २०२५ रोजी ई-निविदा प्रक्रिया सुरू केली होती. मात्र, तांत्रिक निविदांच्या छाननीत एकही निविदाकार पात्र न ठरल्यानं निविदा रद्द करण्यात आली. त्यानंतर १३ मे २०२५ रोजी पुन्हा एकदा निविदा काढण्यात आली. यासंदर्भातील जाहिरात वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती, तसेच शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरही ती उपलब्ध करून देण्यात आली.

या नव्याने काढलेल्या निविदेमध्ये प्राप्त झालेल्या प्रस्तावांची तांत्रिक व व्यावसायिक मूल्यांकन प्रक्रिया पार पडली. यामध्ये रेडियस सिस्टीम या सेवा पुरवठादार कंपनीचा प्रस्ताव सर्व निकषांनुसार योग्य असल्याचे ठरले आणि त्यांच्याशी करार करण्यात आला. या कंपनीला एक आठवड्याच्या आत सर्व साहित्य पुरवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

खरेदी करताना सरकारने काही अटी व शर्ती घातल्या आहेत, ज्यामध्ये वेळेवर साहित्याचा पुरवठा करणे, दर्जेदार व प्रमाणित उत्पादने देणे, आणि काही बाबतीत वॉरंटी व देखभाल सेवा देण्याची हमी घेणे यांचा समावेश आहे. ई-कॅबिनेट प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी ही उपकरणं उपयुक्त ठरणार असून, मंत्रिमंडळाची कार्यपद्धती अधिक तांत्रिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा