रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन दोन दिवसीय भारत दौऱ्यावर आहेत. आज संध्याकाळी ते दिल्लीत पोहोचतील आणि थेट सरदार पटेल मार्गावरील हॉटेलमध्ये जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत त्यांचा खास डिनर आयोजित आहे.
युक्रेन युद्धानंतर हा पुतिनांचा पहिलाच भारत दौरा आहे. अमेरिकेने भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर रशियासोबत व्यापारात दबाव असला तरी भारताने तेल खरेदी सुरू ठेवले असून, 50% टॅरिफ भारतावर लागू झाला तरी अर्थव्यवस्थेवर फारसा परिणाम झाला नाही.
या दौऱ्यात रशियाचे 7 मंत्रीही सहभागी आहेत, ज्यामुळे मोठे करार होण्याची शक्यता वाढली आहे. दौऱ्यादरम्यान संरक्षण, ऊर्जा, व्यापार आणि अमेरिकेच्या निर्बंधांवर चर्चा होईल, तसेच भारत-रशिया संबंधांना महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. दिल्लीमध्ये संपूर्ण सुरक्षा आणि नियोजन केले आहे. 23 व्या वार्षिक शिखर परिषदेत या दौऱ्यादरम्यान सर्व महत्वाचे मुददे चर्चेत येण्याची अपेक्षा आहे.