Admin
Admin
ताज्या बातम्या

ठाण्यात ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो राष्ट्रवादीने बंद पाडला; प्रेक्षकांना कार्यकर्त्यांकडून मारहाण

Published by : Siddhi Naringrekar

छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास दाखवल्याचा आरोपावरुन हर हर महादेव या मराठी चित्रपटाला राज्यभरातून विरोध होत आहे. संभाजी ब्रिगेडच्यावतीने सकाळी पुण्यात हर हर महादेव चित्रपटाचे शो पाडण्यात आले आहे. त्यानंतर रात्री उशिरा ठाण्यामध्येही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनीही थेट चित्रपटगृहात घुसून चित्रपटगृह रिकामे करत हर हर महादेवचा शो बंद पाडला.

यावेळी आव्हाड आक्रमक झाले असून त्यांनी आपल्या कार्याकर्त्यांसह मल्टिप्लेक्समध्ये शिरत घोषणाबाजी करत शो बंद पाडला. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते विनंती करून प्रेक्षकांनी चित्रपटागृहाबाहेर जाण्याची विनंती करीत होते. त्यावेळी काही प्रेक्षकांनी चित्रपटगृहाच्या व्यवस्थापनाकडे तिकिटाचे पैसे परत मागितले. त्यावेळी प्रेक्षक आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाल्याने त्या प्रेक्षकाला मारहाण करण्यात आली.

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि समर्थकांनी ठाण्यातील विवीयाना माॅलमध्ये हर हर महादेवचा शो बंद पाडला आहे. हरहर महादेव चित्रपटातून इतिहासाची मोडतोड केल्याचा आरोप जितेंद्न आव्हाड यांनी केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाला मांडीवर घेतल्याचं दाखवलंय ते तसं नाही, शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्यासंदर्भात जे दाखवलं ते इतिहासाला धरुन नाही. असे ते म्हणाले.

त्यानंतर त्यानंतर मनसे ठाणे अध्यक्ष अविनाश जाधव एकटे त्याच शोमध्ये आले. त्यांनी पुन्हा शो सुरू केला, राज ठाकरे यांनी आदेश दिल्याने मी आलो असे त्यांनी सांगितले. अविनाश जाधव यांनी नंतर सर्व कार्यकर्त्यांना बोलवले आणि सर्वांना शो बघण्यास सांगितले. पोलीस कार्यकर्त्यांना सोडत नव्हते म्हणून जाधव स्वतः बाहेर आले, पुन्हा सर्व कार्यकर्त्यांना घेऊन आत गेले.

मंधाना-शेफालीचा धमाका! टीम इंडियाची विजयी हॅट्ट्रिक; बांगलादेशचा धुव्वा उडवून T20 मालिका जिंकली

"धेर्यशील माने किंवा इतर उमेदवार महत्त्वाचे नाहीत, कारण...", हातकणंगलेत देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

Daily Horoscope 3 May 2024 Rashi Bhavishya: 'या' राशींच्या लोकांचा शुभ काळ होणार सुरु; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष ३ मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

"ज्यांनी गुन्हा केला नाही, त्यांना तुरुंगात टाकण्याचं काम मोदी सरकारनं केलं", सांगलीच्या सभेत शरद पवारांचा हल्लाबोल