MNS Leader Video Viral : मनसे नेत्यांच्या मुलाचा 'त्या अवस्थेतील' Video Viral; अभिनेत्रींला केली शिवीगाळ MNS Leader Video Viral : मनसे नेत्यांच्या मुलाचा 'त्या अवस्थेतील' Video Viral; अभिनेत्रींला केली शिवीगाळ
ताज्या बातम्या

MNS Leader Video Viral : मनसे नेत्याच्या मुलाचा 'त्या अवस्थेतील' Video Viral; अभिनेत्रींला केली शिवीगाळ

मनसे नेत्याचा व्हिडिओ व्हायरल: शिवीगाळ करणाऱ्या मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर खळबळ उडवतो.

Published by : Riddhi Vanne

मुंबईमधील अंधेरी परिसरात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर राजश्री मोरे हिने मनसे नेत्यावर गंभीर आरोप केल्याचे समोर आले आहे. भांडण, धमक्या आणि शिवीगाळ करत अर्धनग्न अवस्थेत असलेल्या मनसे नेते जावेद शेख यांचा मुलगा राहिल शेखने हे घाणेरडे कृत्य केले असून यामुळे सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे.

आपल्या ग्लॅमरस लूकमुळे प्रसिद्ध असलेल्या राखी सावंत याची जवळची मैत्रीण मानली जाणारी राजश्री मोरे हिच्या गाडीचा राहिल शेख याच्या गाडीमुळे अपघात झाला. राहिल शेख हा मद्यपान करत गाडी चालवत असताना अचानक त्याचा त्याच्या गाडीवरील ताबा सुटला आणि त्याची गाडी राजश्री मोरे हिच्या गाडीवर आदळली. सुदैवाने यात कोणाला हानी झालेली नसली तरी राजश्री मोरे या घटनेने संतापली आणि राहिल शेख याला जाब विचारायला गेली. मद्यधुंद अर्धनग्न अवस्थेत असलेल्या राहिल शेखने यावर तिला धमकी देत शिवीगाळ केली."ए ... पैसे घे आणि पोलिसांना जाऊन सांग जा.... मी मनसे नेते जावेद शेख याचा मुलगा आहे" अश्या शब्दात त्याने तिला धमकावले. घटनास्थळी असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांनाही त्याने अश्याच प्रकारे शब्द वापरले. दरम्यान राजश्री मोरे हिने हा सर्व प्रकार रेकॉर्ड केला आणि सोशल मीडियावर टाकला. त्याचबरोबर तिने राहिल शेखवर एफआयआर दाखल करत त्याचा फोटोही तिने पोस्ट केला.

मात्र या प्रकरणामुळे तिला मनसे कार्यकर्त्यांकडून धमक्यांचे फोन येत असल्याचे तिने सांगितले. सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या खूप वायरल होत असून नेटकरी यावर खूप संतप्त कमेंट करताना दिसत आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा