ताज्या बातम्या

राहुल गांधी पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर; 'या' ठिकाणी होणार जाहीर सभा

Published by : Siddhi Naringrekar

लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. प्रचाराला देखील सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आता राहुल गांधी पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहे. राहुल गांधी यांची भंडाऱ्यात तर प्रियांका गांधी यांची चंद्रपूरमध्ये प्रचार सभा पार पडणार आहे.

निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भातील भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, नागपूर आणि रामटेक येथे १९ एप्रिलला मतदान होणार आहे. राहुल गांधी यांची१३ एप्रिलला भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे जाहीर प्रचार सभा होणार आहे.

यासोबतच प्रियंका गांधी १५ एप्रिलला चंद्रपुरात सभेला संबोधित करणार आहेत. काँग्रेसने भंडारा-गोंदिया लोकसभेसाठी डॉ. प्रशांत पडोळे यांना उमेदवारी दिली आहे. तर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात प्रतिभा धानोरकर या काँग्रेसच्या उमेदवार आहेत.

"पहिल्या चार टप्प्यातच आम्ही महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचा सुफडा साफ केला "; उपमुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा दावा

मोठी बातमी! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडेला उदयपूरमधून अटक

World Hypertension Day 2024 : 'जागतिक उच्च रक्तदाब दिवस' कधी आणि का साजरा केला जातो?

"४ तारखेनंतर टरबूजचा भाव उतरणार आहे"; उद्धव ठाकरेंची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर घणाघाती टीका

Daily Horoscope 17 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांना साडेसातीचाही होणार त्रास; पाहा तुमचे भविष्य