Rahul Gandhi and Priyanka Gandhi Team Lokshahi
ताज्या बातम्या

Rahul Gandhi : ईडीच्या तीन अधिकाऱ्यांकडून राहुल यांची चौकशी, हे प्रश्न विचारले

घरुन निघतांना प्रियंका गांधी सोबत होत्या

Published by : Team Lokshahi

नवी दिल्ली :

नॅशनल हेराल्ड प्रकरणी (National Hearald Case) अंमलबजावणी संचालनालयाने (ED) काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना नव्याने समन्स बजावले होते. यानुसार राहुल गांधी चौकशीसाठी आज ईडीसमोर हजर झाले आहेत. तीन अधिकारी राहुल गांधी यांची चौकशी करत आहेत. असिस्टेंट डायरेक्टर दर्जाचे अधिकारी राहुल यांची चौकशी करत आहेत. (Rahul Gandhi appears before the Enforcement Directorate in the National Herald case)

चौकशीपुर्वी शपथ

ईडी जेव्हा कोणाची चौकशी करते तेव्हा त्याआधी त्याला शपथही दिली जाते. यात म्हटले आहे की, मी जे काही बोलेल ते खरे असेल. राहुल यांना जे प्रश्न विचारले जातील, त्यांचे लेखी उत्तर त्यांना द्यावे लागेल. ती उत्तरे त्यांना वाचून दाखवली जातील. त्यानंतर त्यावर राहुलची सही घेतली जाईल. त्यानंतर ती उत्तरे टाईप केली जातील, त्यावर राहुल यांची सही असेल.

राहुलच्या हजेरीपूर्वी प्रियंका गांधी वाड्रा त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचल्या. येथून राहुल-प्रियांका काँग्रेस मुख्यालयात पोहोचले आणि पक्षाच्या नेत्यांची बैठक घेतली. बैठकीनंतर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यासह पक्षाचे खासदार आणि इतर नेते पायी चालत ईडी कार्यालयाकडे रवाना झाले. पोलिसांनी बॅरिकेड्स लावून काँग्रेसचा मोर्चा थांबवला. नेत्यांना पुढे जाऊ दिले नाही. राहुल गांधी प्रियंकासोबत कारने ईडीच्या मुख्यालयात पोहोचले.

राहुल यांच्यांसोबत काँग्रेस मुख्यालयातून हजारो काँग्रेस चालत ईडी कार्यालयासमोर आले. त्यांना एक किलोमीटर अगोदरच थांबवण्यात आल्याने ते रस्त्यावरच धरणे धरून बसले. आंदोलन करणाऱ्या काँग्रेस खासदार रणदीप सिंग सुरजेवाला आणि इतर नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांशी झटपट

ईडी कार्यालयाजवळ तीन थरांची सुरक्षा व्यवस्था आहे. काँग्रेसचा मोर्चा पहिल्या सर्कलजवळ पोलिसांनी रोखला होता. येथे कार्यकर्त्यांची पोलिसांशी झटापटही झाली. याआधी सोमवारी सकाळी राहुल गांधींच्या तपासाविरोधात आंदोलन करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना दिल्ली पोलिसांनी काँग्रेस मुख्यालयातून ताब्यात घेतले. पोलिसांनी काँग्रेसजनांना बसमध्ये बसवले होते. काँग्रेसची कामगिरी पाहता दिल्ली पोलिसांनी काँग्रेस मुख्यालय ते ईडी कार्यालयापर्यंतचा रस्ता सील केला होता.

हे आहेत प्रश्न

  • AJLमध्ये तुमची काय भूमिका होती?

  • यंग इंडियामध्ये तुमची भूमिका काय?

  • तुमच्या नावावर शेअर्स का आहेत?

  • तुमची कधी भागधारकांशी बैठक झाली आहे का, नसेल तर का?

  • काँग्रेसने इंग इंडियाला कर्ज का दिले?

  • काँग्रेसला नॅशनल हेराल्डचे पुनरुज्जीवन का करायचे होते?

  • काँग्रेसने दिलेल्या कर्जाची माहिती देऊ शकाल का?

  • AJL आणि नॅशनल हेराल्डच्या मालमत्तेबद्दल माहिती देऊ शकाल का?

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात

Jalgaon Accident : आयशर वाहनाची एसटी बसला जोरदार धडक; बसचे मोठे नुकसान, 1 जणाचा मृत्यू, 25 प्रवासी जखमी