Admin
Admin
ताज्या बातम्या

Rahul Gandhi : मोठी बातमी: राहुल गांधींची खासदारकी रद्द; लोकसभा अध्यक्षांची कारवाई

Published by : Siddhi Naringrekar

राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. 2019 मध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी आडनावाबाबत केलेल्या टीकेच्या प्रकरणी सुरत न्यायालयाने काल (23 मार्चला) आपला निकाल दिला. न्यायालयाने राहुल गांधींना दोषी ठरवले असून आता त्यांना 2 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली. त्यांना दोन वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. मात्र, न्यायालयाने त्यांना उच्च न्यायालयात जाण्यासाठी ३० दिवसांची मुदत देत जामीन मंजूर केला.

मोदी आडनावावर टिप्पणी केल्याबद्दल राहुल यांच्यावर गुन्हेगारी मानहानीचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी आजच निर्णय अपेक्षित आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी कर्नाटकातील कोलार येथील सभेत राहुल गांधी म्हणाले होते की, सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे? या संदर्भात भाजपचे आमदार आणि गुजरातचे माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला होता. राहुल यांनी आपल्या वक्तव्याने संपूर्ण मोदी समाजाची प्रतिष्ठा खाली आणल्याचा त्यांचा आरोप होता.


राहुल गांधींना या केसमध्ये दोन वर्षांची शिक्षा झाल्यानंतर त्यांच्या खासदारकीवर परिणाम झाला आहे. लोकप्रतिनिधीला कुठल्याही न्यायालयानं दोन वर्षांची शिक्षा ठोठावल्यास त्याचं सदस्यत्व धोक्यात येते. त्यामुळे लोकसभा अध्यक्षांकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या 10 जुलै 2013 च्या निकालानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांना अंतरिम दिलासा नाहीच

Mumbai Water Supply : मुंबईकरांवरील पाणीकपातीचं संकट तूर्तास टळलं, पाणी जपून वापरण्याचे आवाहन

"महिलांचा विचार करणारे नरेंद्र मोदी देशातील पहिले पंतप्रधान", उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

बिगबॉस फेम वीणा जगताप करणार ‘रमा राघव’ मालिकेत एन्ट्री

Sanjay Raut On PM Modi: "खोटं बोलण्याची स्पर्धा जगात लावली तर ऑलिम्पिकला नरेंद्र मोदीला गोल्डमॅडल मिळाले पाहिजे"