ताज्या बातम्या

'इंग्रज काँग्रेसमुक्त करू शकले नाही तर मोदी काय करतील' राहुल गांधींचा खोचक टोला

काँग्रेस नेते राहुल गांधी इंडिया बैठकीसांठी मुंबई दौऱ्यावर आले आहेत.इंडिया आघाडीची बैठक संपल्यानंतर राहुल गांधी यांनी टिळक भवन येथे पक्षाच्या एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांना

Published by : shweta walge

काँग्रेस नेते राहुल गांधी इंडिया बैठकीसांठी मुंबई दौऱ्यावर आले आहेत. इंडिया आघाडीची बैठक संपल्यानंतर राहुल गांधी यांनी टिळक भवन येथे पक्षाच्या एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांना संबोधित केले आहे. यावेळी त्यांनी 'मोदी आले होते तेव्हा त्यांनी म्हटलं होतं काँग्रेस मुक्त भारत, इंग्रज काँग्रेसमुक्त करू शकले नाही तर मोदी काय करतील' असा टोला त्यांनी लगावला आहे.

काय म्हणाले राहुल गांधी?

अदानीचा पैसा काँग्रेस पक्ष मिटवू शकतो का? करोडो रुपये परदेशात गुंतवले. मोदी आणि अदानीच जून रिलेशन आहे. देशातल्या पैशानेच अदानी काय काय विकत घेत आहेत. काँग्रेस पार्टीमध्ये काही दम नाही. तर कर्नाटक मध्ये भाजपला फटकावलं कोणी, महाराष्ट्रात आमची पार्टी तर तुटली नाही ना... आपली पार्टी ही विचारधारेवर आहे. आपल्या सगळ्यांच्या रक्ताची चाचणी केली तर डीएनए एकच मिळेल. कोणाला घाबरत नाही. आपला पक्ष बब्बर शेर आहे.काँग्रेस पक्षापासून मोदी आरएसएस यांना भीती वाटते. तेलंगणा राजस्थान कर्नाटकमध्ये जे झालं, लोकसभा निवडणुकीत देखील होणार आहे. इंडिया मोदीला हरवणार असा विश्वास त्यांनी यावेळी दाखवला आहे.

काँग्रेस नेत्यांमधलं नातं हे प्रेमाचं आहे. आपण विरोधकांच्या घरात जाऊन नफरत के बाजार में प्यार की दुकान खोल देते है...( मोदी आणि त्यांचे कार्यकर्ते कसे करतात त्याबद्दल नक्कल करून दाखवतायत ) कोणत्याही आरएसएसचा कार्यकर्त्याला विचारा, आपल्यातून किती जण घर सोडून पळाले तर ते सगळे हाथवर करतात. आपल्या हृदयात सगळ्यांबद्दल प्रेम आदर आहे. त्यांच्या मनात द्वेष आहे. मी गळा भेट देखील घेतली होती. आपल्याला त्यांच्या घराघरांमध्ये जायचं आहे प्रेमाची दुकान उघडायची आहे.

तुमच्यात आलो आज बरं वाटतंय. मी आईशी जस बोलतो, तस आज तुमच्याशी बोलताना वाटतय. कधी कधी एकमेकांमध्ये आपण रुसतो पण चालतं काय हरकत नाही. पण निवडणुकीच्या वेळेला एका मताने काम करा. मला मुंबई खूप आवडते. महाराष्ट्र हा काँग्रेस पक्षाचा न्यूकलेयस असल्यास ते म्हणाले आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा