Rahul gandhi  Team Lokshahi
ताज्या बातम्या

Rahul Gandhi : सलग तिसऱ्या दिवशी राहुल यांची चौकशी, भाजप-काँग्रेस आमनेसामने

नॅशनल हेराल्ड प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची तिसऱ्या दिवशीही चौकशी सुरु आहे.

Published by : Team Lokshahi

नॅशनल हेराल्ड प्रकरणी (National Hearald Case) अंमलबजावणी संचालनालयाने (ED) काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची तिसऱ्या दिवशीही चौकशी सुरु आहे. पहिले दोन दिवस चौकशी अपुर्ण राहिल्यामुळे तिसऱ्या दिवशीही त्यांना बोलवण्यात आले. आजही तीन सदस्यीय टीम राहुलची चौकशी करत आहे.दुसरीकडे काँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्ष मुख्यालयाबाहेर जोरदार निदर्शने केली. निदर्शनाची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी अकबर रोडजवळ आधीच बॅरिकेड्स लावले होते आणि परिसरात CrPC कलम 144 लागू करण्यात आले होते.

काँग्रेसच्या टीकेवर आक्रमक भूमिका घेत भाजपने म्हटले की, राहुल गांधी यांनी चौकशीपेक्षा दिलेली विधाने दुरुस्त करण्यातच जास्त वेळ घालवला आहे. दोन दिवस चाललेली ही चौकशी जवळपास 6-7 तास चालली आहे. कारण प्रथम राहुल गांधी प्रश्नांची उत्तरे लिहिण्यात आणि नंतर त्यांची निराकरण करण्यात बराच वेळ घालवला.

हा रानटीपणा

दिल्लीतील पक्ष कार्यालयाबाहेर काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. यावेळी उपस्थित अधीर रंजन चौधरी म्हणाले की, हे सरकार गुन्हेगार आहे, या सरकारने लोकशाहीचा ऱ्हास केला आहे. आम्ही प्रशासनाला काही विचारल्यावर ते सांगतात की आम्हाला वरून सूचना दिल्या आहेत, म्हणजेच मोदी-शहा यांच्याकडूनच सूचना दिल्या आहेत. असा रानटीपणा भारतात याआधी पाहिला नाही.

भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांनी नॅशनल हेराल्ड प्रकरणाची पहिल्यांदा चौकशी केली होती. त्यानंतर या प्रकरणाशी संबंधित सर्वच काँग्रेस नेत्यांची चौकशी सुरु झाली.

राहुलच्या हजेरीपूर्वी प्रियंका गांधी वाड्रा त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचल्या. येथून राहुल-प्रियांका काँग्रेस मुख्यालयात पोहोचले आणि पक्षाच्या नेत्यांची बैठक घेतली. बैठकीनंतर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यासह पक्षाचे खासदार आणि इतर नेते पायी चालत ईडी कार्यालयाकडे रवाना झाले. पोलिसांनी बॅरिकेड्स लावून काँग्रेसचा मोर्चा थांबवला. नेत्यांना पुढे जाऊ दिले नाही. राहुल गांधी प्रियंकासोबत कारने ईडीच्या मुख्यालयात पोहोचले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा