लोकसभेत आज नेत्यांची चर्चा झाली या चर्चेत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी अनेक मुद्दे मांडले आहेत. लोकसभेत राहुल गांधींकडून मतदारांच्या आकडेवाडीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला, तसेच राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर लोकसभेत कॉंग्रेस नेते राहुल गांधींनी उत्तर दिले आहे.
इंडिया आघाडीचं सरकार असत तर...- राहुल गांधी
यापार्श्वभूमिवर राहुल गांधी म्हणाले की, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 70 लाख नवीन मतदार वाढले, त्याचसोबत शिर्डीतल्या 7 हजार मतदारांचे पत्ते एकाच इमारतीचे असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. पुढे लोकसभेतील अर्थसंकल्पावरील राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना राहुल गांधी म्हणाले की, राष्ट्रपतींच्या अभिभाषणात नवीन काहीच नव्हत... मागच्या वेळीही आम्ही असेच भाषण ऐकले होते... हे आपल्याला मान्यच करावं लागेल की, राष्ट्रपतींनी लोकसभेत अर्थसंकल्प दरम्यान जे अभिभाषण केलं त्यात बेरोजागारी, बेकारी हे शब्द देखील नव्हते... आज देशात सर्वात मोठा प्रश्न आहे, तो म्हणजे बेरोजगारीचा.... इंडिया आघाडीचं सरकार असतं, तर राष्ट्रपतींचं भाषण असं नसतं, असं राहुल गांधी म्हणाले.
देश उत्पादन वाढवण्यात अपयशी ठरला- राहुल गांधी
तसेच राहुल गांधी पुढे म्हणाले की, मेक इन इंडिया ही चांगली कल्पना होती.... 'मेक इन इंडियाची' आयडिया चांगली पण योजना पूर्णपणे फेल गेली आहे... देश उत्पादन वाढवण्यात अपयशी ठरला, त्याचा परिणाम अर्थातच नोकऱ्यांवर म्हणजेच रोजगारांवर झाला... देशात बेरोजगारीचे प्रमाण जस होत तसचं आहे, मागील दहा वर्षात कुठलाही बदल झालेला दिसत नाही... देशाचे भविष्य तरुणांवर अवलंबून आहे... या देशातील मोबाईल देशाअंतर्गत बनत नाही, तर फक्त असेंबल होतात... कॉम्प्युटर क्रांतीवरुन देशात कॉंग्रेसची खिल्ली उडवली जात आहे... देशातील बेरोजगारीचा मुद्दा मांडत राहुल गांधींनी केंद्र सरकार तसेच राष्ट्रपतींवर जोरदार टीका केली आहे.