Admin
ताज्या बातम्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देवालाही सांगू शकतात की ब्रह्मांडात काय चाललं आहे? - राहुल गांधी

राहुल गांधी सहा दिवस अमेरिका दौऱ्यावर आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

राहुल गांधी सहा दिवस अमेरिका दौऱ्यावर आहेत. यावेळी तिथे भाषण करताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

राहुल गांधी म्हणाले की, आमची भारत जोडो यात्रा रोखण्याचे हर तऱ्हेने प्रयत्न करण्यात आले.मात्र सरकारचे सगळे प्रयत्न अपयशी ठरले. . भारत जोडो यात्रेत आम्ही प्रेम, आपुलकी आणि मैत्री हेच पसरवण्याचं काम केलं. आमच्या मनात ही भावना होती की संपूर्ण भारत आमच्याबरोबर चालतो आहे. असे राहुल गांधी म्हणाले.

तसेच ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देवालाही सांगू शकतात की ब्रह्मांडात काय चाललं आहे?भारतात काही लोक आहेत ज्यांना वाटतं की आम्ही सर्वज्ञानी आहोत. त्यापैकी एक नरेंद्र मोदी आहेत. त्यांना वाटतं की आपल्याला प्रत्येक गोष्टीतली सगळी माहिती आहे. पण मुळात असं आहे की त्यांना काहीही माहित नाही. असे राहुल गांधी म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मीनाताईं ठाकरेंच्या पुतळ्यावर अज्ञात व्यक्तीने लाल रंग फेकला; पोलिसांकडून तपास सुरू

Devendra Fadnavis : मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी गोंधळ; देवेंद्र फडणवीस म्हणाले...

Raj Thackeray : भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरुन व्यंगचित्र काढत राज ठाकरेंची टीका

India - US Trade Deal : भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय व्यापार करारावर महत्त्वाची चर्चा; लवकर निर्णयाची शक्यता