ताज्या बातम्या

Rahul Gandhi : राहुल गांधी आज सांगली दौऱ्यावर

लोकसभेचे विरोधी पक्षनेते व काँग्रेस नेते राहुल गांधी आज सांगली दौऱ्यावर येणार आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

लोकसभेचे विरोधी पक्षनेते व काँग्रेस नेते राहुल गांधी आज सांगली दौऱ्यावर येणार आहेत. डॉ. पतंगराव कदम यांच्या स्मृतिस्थळाचे आज लोकार्पण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी उपस्थित राहणार आहेत. यासोबतच मल्लिकार्जुन खर्गे, शरद पवार यांच्यासह दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत.

यानिमित्ताने राहुल गांधी यांची सभा देखील पार पडणार असून कडेगाव येथील भारती विद्यापीठ आवारात राहुल गांधी यांची सभा संपन्न होणार आहे. या पार्श्वभूमीवर कडेगाव मध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे.

याच पार्श्वभूमीवर या कार्यक्रमासाठी उद्धव ठाकरे मात्र उपस्थित राहणार नाही आहेत. विश्वजीत कदम यांनी उद्धव ठाकरे यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण मातोश्रीवर जाऊन दिले होते. उद्धव ठाकरे यांनी खाजगी दौरा असल्याचे सांगितले. त्यामुळे आता उद्धव ठाकरे कार्यक्रमाला येणार नसल्याने आता चर्चा रंगल्या आहेत. हा कार्यक्रम सांगलीतील सोनहिरा साखर कारखान्याच्या आवारात होणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Eknath shinde On Thackeray vijayi melava : "...त्यासाठी मनगटात जोर लागतो", ठाकरेंच्या विजयी मेळाव्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

Raj Thackeray : भाषणानंतर राज ठाकरेंनी व्यक्त केली होती दिलगिरी, कारण ऐकून बसेल धक्का...

Devendra Fadanvis On Vijayi Melava : विजयी मेळाव्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मानले खोचक आभार ; म्हणाले, "मला जबाबदार धरलं त्यासाठी..."

Nitesh Rane On Thackeray Brothers : "यांच्यात नवरा कोण आणि नवरी कोण?" ठाकरेंच्या विजयी मेळाव्यानंतर नितेश राणेंची प्रतिक्रिया