Admin
ताज्या बातम्या

Rahul Gandhi : मानहानी प्रकरणी राहुल गांधी यांना 2 वर्षाची शिक्षा

2019 मध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी आडनावाबाबत केलेल्या टीकेच्या प्रकरणी सुरत न्यायालयाने आज आपला निकाल दिला आहे.

Published by : Siddhi Naringrekar

2019 मध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी आडनावाबाबत केलेल्या टीकेच्या प्रकरणी सुरत न्यायालयाने आज आपला निकाल दिला आहे. न्यायालयाने राहुल गांधींना दोषी ठरवले असून आता त्यांना 2 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

मोदी आडनावावर टिप्पणी केल्याबद्दल राहुल यांच्यावर गुन्हेगारी मानहानीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आजच निर्णय अपेक्षित आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी कर्नाटकातील कोलार येथील सभेत राहुल गांधी म्हणाले होते की, सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे? या संदर्भात भाजपचे आमदार आणि गुजरातचे माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला होता. राहुल यांनी आपल्या वक्तव्याने संपूर्ण मोदी समाजाची प्रतिष्ठा खाली आणल्याचा त्यांचा आरोप होता.

मुख्य न्यायदंडाधिकारी एचएच वर्मा यांच्या न्यायालयाने गेल्या शुक्रवारी दोन्ही बाजूंचा अंतिम युक्तिवाद ऐकल्यानंतर निकालासाठी २३ मार्चची तारीख निश्चित केली. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान राहुल तीनदा कोर्टात हजर झाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?