Rahul Gandhi On CBI And ED
Rahul Gandhi On CBI And ED 
ताज्या बातम्या

१७०० कोटींची नोटीस मिळाल्यानंतर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधी ट्वीटरवर म्हणाले, "जेव्हा सरकार बदलेल..."

Published by : Naresh Shende

प्राप्तिकर विभागाने काँग्रेसला तब्बल १७०० कोटी रुपयांची नोटीस पाठवलीय. ही नोटीस मिळाल्यानंतर राहुल गांधी यांनी ट्वीटरच्या माध्यमातून सीबीआय, ईडीला धारेवर धरलं आहे. राहुल गांधी यांनी केलेल्या ट्वीटने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. "जेव्हा सरकार बदलेल तेव्हा लोकशाहीची दडपशाही करण्यांवर नक्कीच कारवाई होणार. त्यानंतर असं काही करण्याची कुणाचीच हिंमत होणार नाही", असा इशारा राहुल गांधी यांनी सीबीआय आणि ईडीला दिला आहे.

काँग्रसने पत्रकार परिषद घेऊन भाजपवर कर दशहतवाद पसरवल्याचा आरोप केला आहे. तसच भाजप लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहे, असा हल्लाबोल काँग्रेसने भाजपवर केला आहे. तसंच राहुल गांधी यांनी ट्वीट करत म्हटलं, राहुल गांधी यांनी ट्वीटरवर म्हटलंय, जर सीबीआय आणि ईडीसारख्या संस्थांनी व्यवस्थित काम केलं असतं, तर असं काही घडलं नसतं. कोणत्या ना कोणत्या दिवशी भाजपच सरकार बदलेल आणि मग कारवाई होणार, याचा त्यांनी विचार करावा. अशी कारवाई होईल की अशाप्रकारच्या गोष्टी कधीच होणार नाही, याची मी शाश्वती देतो.

Amit Shah On Kejriwal : 'केजरीवालांना जामिनाबाबत विशेष वागणूक' अमित शाहांचा मोठा दावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शोवर संजय राऊत यांची टीका; म्हणाले...

नाशिकमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या सभेत घोषणाबाजी; रोहित पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Ajit Navle : 2 शब्द कांद्यावर बोलण्याऐवजी शेतकऱ्यांवर जर अशाप्रकारची दडपशाही होत असेल तर ही नक्कीच निषेधार्य गोष्ट आहे

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला; 16 जणांचा मृत्यू