केरळच्या वायनाडमधून पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या प्रियंका गांधी वड्रा यांनी आज खासदार म्हणून शपथ घेतली. मात्र, आज सोशल मीडियावर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची चर्चा रंगली आहे. कारण आज आपल्या लाडक्या बहिणीसाठी राहुल गांधी हे फोटोग्राफर बनल्याच पाहायला मिळालं. त्यांच्या या अनोख्या अंदाजाची आज सोशल मीडियावर चांगलीच चर्चा पाहायला मिळत आहे.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. प्रियंका गांधी वड्रा यांनी आज खासदार म्हणून शपथ घेतली.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी प्रियंका गांधी यांना खासदारकीची शपथ दिली. यावेळी संपूर्ण गांधी परिवार संसदेत उपस्थित होता.
प्रियांका गांधी लोकसभेवर निवडून आलेल्या नेहरू कुटुंबातील 16व्या सदस्य आहेत.
यावेळी राहुल आणि प्रियांका यांच्यात जबरदस्त बाँडिंग पाहायला मिळालं. संसदेत प्रवेश करताना राहुल फोटोग्राफरच्या भूमिकेत दिसले.
राहुल गांधी यांनी आपली लाडकी बहिण प्रियंका गांधी यांचे अनेक फोटो काढले. यानंतर सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार प्रियंका गांधी यांनी नुकताच मोठा विजय मिळवला आहे.
राहुल गांधींनी वायनाडची जागा सोडल्यानंतर त्यांची बहीण प्रियंका गांधी यांनी येथे निवडणूक लढवली होती.
सुमारे साडेतीन दशकांचा राजकीय अनुभव असलेल्या प्रियंका यांनी पहिल्यांदाच निवडणुकीच्या राजकारणात प्रवेश केला आणि वायनाडमधून पोटनिवडणूक लढवली.