ताज्या बातम्या

Rahul Gandhi : काँग्रेसच्या प्रशिक्षण शिबिराला उशीराला पोहचले, भोगावी लागली राहुल गांधींना शिक्षा

मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर गेलेल्या काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना त्यांच्या पक्षांच्या शिस्तीच्या कठोर नियमांचा सामना करावा लागला. उशीरा पोहचल्याने शिक्षा म्हणून राहुल गांधी यांनी १० पुशअप कराव्या लागल्या.

Published by : Varsha Bhasmare

थोडक्यात

  • काँग्रेसमध्ये सर्वांसाठी समान नियम

  • शिबिरात उशीराची ठरलेली शिक्षा

  • बीजेपीवर ‘व्होट चोरी’चा आरोप

मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर गेलेल्या काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना त्यांच्या पक्षांच्या शिस्तीच्या कठोर नियमांचा सामना करावा लागला. उशीरा पोहचल्याने शिक्षा म्हणून राहुल गांधी यांनी १० पुशअप कराव्या लागल्या. पंचमढीमध्ये आयोजित काँग्रेस जिल्हा अध्यक्षांच्या प्रशिक्षण सत्रा दरम्यान उशीरा येणाऱ्यांना अनोखी शिक्षा देण्याचा पायंडा पाडला होता. उशीरा येणाऱ्याचे स्वागत टाळ्या वाजून त्यांना ‘टाईम मॅनेजमेंट’ महत्व कळावे, आणि प्रतिकात्मक शिक्षाही दिली जात होती. राहुल गांधी स्वत:च २० मिनिटे उशीरा पोहचल्याने त्यांनी हसत शिक्षा कबुल केली आणि वातावरण हलके फुलके केले.

काँग्रेसमध्ये सर्वांसाठी समान नियम

काँग्रेसचे मीडिया समन्वयक अभिनव बरोलिया यांनी सांगितले की, शिबिरात कडक अनुशासन पाळले जाते आणि कोणालाही विशेष वागणूक दिली जात नाही. राहुलजींसाठी हे काही नवीन नाही. आमच्या पक्षात सर्व समान आहेत. भाजप सारखी ‘बॉसगिरी’ येथे नाही.

शिबिरात उशीराची ठरलेली शिक्षा

पक्ष सूत्रांच्या माहितीनुसार, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या प्रशिक्षण विभागाचे प्रमुख सचिन राव यांनी ‘संगठन सृजन अभियान’अंतर्गत शिबिरात उशीर करणाऱ्यांसाठी 10 पुशअप ही शिक्षा निश्चित केली होती. 2028 च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी संघटना मजबूत करण्याच्या उद्देशाने हा प्रशिक्षण कार्यक्रम सुरू आहे आणि तो 11 नोव्हेंबरला संपणार आहे.

बीजेपीवर ‘व्होट चोरी’चा आरोप

पंचमढीत राहुल गांधी यांनी सत्ताधारी भाजपा आणि निवडणूक आयोगावर कायम ठेवला. त्यांनी निवडणूक आयोगावर मोठ्या प्रमाणात अनियमितता केल्याचा आरोप केला आणि मध्य प्रदेशातही अशाच प्रकारचा गोंधळ आयोगाने केला असल्याचा आरोप केला. राहुल गांधी म्हणाले की काही दिवसांपूर्वी मी हरियाणा मॉडेल सादर केले होते. २५ लाख व्होट चोरी झाले होतो. प्रत्येक आठ मतदारांपैकी एक व्होट चोरले होते. ही यांची व्यवस्था आहे. मुख्य मुद्दा ‘व्होट चोरी’ आहे. आमच्याजवळ पुरावे आहेत आणि आम्ही एक- एक करुन जाहीर करणार आहोत. या आरोपांना भाजपा आणि निवडणूक आयोगाने हे आरोप फेटाळले आहेत.

बीजेपीची टीका, राहुल हे ‘लीडर ऑफ पर्यटन’

या दरम्यान भाजपाने राहुल गांधी यांच्यावर टीका करताना म्हटले की बिहार निवडणूक प्रचारात राहुल सुट्टीवर होते. भाजपाचे प्रवक्ते शहजाद पुनावाला यांनी एक्स पोस्ट करत म्हटले की, ‘राहुल गांधी यांच्यासाठी विरोधी पक्ष नेता (LoP) म्हणजे ‘लीडर ऑफ पर्यटन (Paryatan)’ आणि पार्टी करणे आहे. त्यांनी टीका करताना म्हटले की जेव्हा बिहारात निवडणूक सुरु आहे, राहुल गांधी पंचमढीत जंगल सफारीचा आनंद घेत आहेत. पुनावाला यांनी गालिब यांच्या ओळी बदलून म्हटले यावरुन त्यांची प्राथमिकता कळते. आणि निवडणूक हरल्यानंतर ते ईसीआयला दोष देतील.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा