थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Rahul Gandhi ) राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे. केंद्रीय दक्षता आयुक्तांच्या मुद्द्यावर भेट घेणार असल्याची माहिती मिळत असून पुढील मुख्य माहिती आयुक्तांची निवड करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय निवड समितीची बैठक पार पडणार आहे.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे देखील या समितीचे सदस्य आहेत. केंद्रीय माहिती आयोगातील (सीआयसी) रिक्त पदे भरण्यासाठी होणाऱ्या बैठकीला राहुल गांधी उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. केंद्रीय दक्षता आयुक्तांच्या मुद्द्यावर ही भेट होणार असल्याची माहिती आहे.
Summery
राहुल गांधी पंतप्रधान मोदींची भेट घेणार
थोड्याच वेळात राहुल गांधी पंतप्रधान मोदींची भेट घेणार
केंद्रीय दक्षता आयुक्तांच्या मुद्द्यावर भेट घेणार